इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रबळ असेल तर हिमालयाएवढे संकट सुद्धा साध्या वावटळीसारखे होऊन जाते. ह्यापुढे कितीही लोकांनी आणि विरोधकांनी खोडा घातला तरी सत्तेची माळ मात्र गळ्यात पडल्याशिवाय रहात नाही. असा बलवान राजयोग इगतपुरी तालुक्यातील एकाच कुटुंबासाठी वरदान ठरला आहे. मागील एकाच महिन्यात ह्याच कुटुंबातील पिता आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र यांना वेगवेगळ्या संस्थांच्या चेअरमनपदावर विराजमान झाले. […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज “ओलें मूळ भेदी खडकाचें अंग | अभ्यासासी संग कार्यसिध्दी” ह्या अभंगाद्वारे असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात. त्या अभंगाचा सारांश असा आहे की, दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते पण हेच विष सातत्याने थोडे थोडे […]
लेखक – हिरालाल पगडाल, संगमनेर छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते, सतराव्या शतकातील इतिहासाचे नायक होते, असामान्य राज्यकर्ते होते पण त्यांच्या इतिहासात असत्याची भेसळ करून सर्व सामान्य रयतेच्या हृदय सिंहसनावर आरूढ असलेल्या या लोकोत्तर राजाला जातीच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या चौकटीत बंद करण्याचे पाप काही संकुचित विचारांची मंडळी करीत आहेत. हि संकुचित विचारांची मंडळी आपले गैरहेतू साध्य करण्यासाठी […]
सौर पथदीप बसवणारे जामुंडे हे नाशिक जिल्ह्यातील पहिलेच गाव इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही खऱ्या अर्थाने वीज पोहोचलेली नाही. त्यात आदिवासी वाड्यापाड्यांची दशा आणि दिशा सांगायला नको एवढी वाईट आहे. अशा भयानक परिस्थितीत जामुंडे ह्या विजेचा लपंडाव असणाऱ्या जामुंडे आदिवासी गावातील आदिवासी नागरिकांना काळ्याकुट्ट अंधारामध्ये कसेबसे दिवस काढावे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – मदतीची गरज असतांना समाजाकडून डोळेझाक झाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडल्याने शेवटचा टोकाचा मार्ग पत्करायला निघालेल्या युवकाला जगण्याचा मोठा आधार लाभला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा इगतपुरी तालुक्याचे आरोग्यदूत गोरख बोडके यांच्या मदतीने अपघातग्रस्त वीज कर्मचारी अमोल जागले या युवकावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. ह्या कामासाठी मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पृथ्वी घटकांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी ७५ लाख आणि नाशिक विभागस्तरीय प्रथम कामगिरीसाठी ५० लाख असे तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस घोषित झाल्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 29 समृद्ध ग्रामविकास साधण्यासाठी सक्षम सरपंचांची भक्कम फौज कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके नेहमीच दोन पावले पुढे असतात. यासाठी त्यांनी स्वखर्चाने अभिनव अभ्यासदौरा आयोजित करून इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील ५० सरपंचांना अभ्यासदौऱ्यात सहभागी करून घेतले. विकासासाठी रात्रंदिवस सूक्ष्मपणे काम करून राज्यासमोर आदर्श घडवलेल्या विकासाचा आलेख त्यांना दाखवण्यात आला. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी […]
इगतपुरीनामा न्यूज दि. ०८ : दिवंगत जितेंद्र गोस्वामी हे भटक्या विमुक्तांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा शैक्षणिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी आदर्शवत आहे. त्यांचे काम पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेच्या प्रांगणात गोस्वामी यांच्या पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी […]
गाव तेथे वाचनालय -अमेरीकेतील रीयल डायनॅमीक्सच्या सामाजिक सहभागातून वाचनालय चळवळ इगतपुरीनामा न्यूज दि. ०२ : तालुक्यातील दुर्गम गाव मोगरे येथे एसएनएफ वाचनालयाचे उदघाटन लेखक आणि विचारवंत डॉ. शरद बाविस्कर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. धुळे जिल्ह्यातील सुपुत्र असलेले शरद बाविस्कर सध्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सध्या त्यांचे भुरा हे […]
इगतपुरी तालुक्यात लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले मातोश्री हॉस्पिटल भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुका म्हणजे दुर्गम आणि आदिवासी तालुका.. ह्या तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा हव्या असतील तर थेट नाशिक गाठावे लागते. त्यामुळे आटोग्याची चिंता असणाऱ्या लोकांना आता चिंतामुक्त होण्याची संधी आहे. अनेक नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये नाशिक मुंबईमध्ये […]