राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी १३ जुलैला आरक्षण सोडत निघणार : सप्टेंबरमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजण्याची दाट शक्यता

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा बिगुल वाजला आहे. इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षण सोडत काढतांना ओबीसी वगळून आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी […]

नैसर्गिक काजवा महोत्सव, रानपक्षी, प्राणी आणि रानमेव्याचा मनसोक्त आनंद देणारे इगतपुरी तालुक्यातील मायदरा : जैवविविधता जपुन निखळ पर्यटनाचा आनंद देणारे अव्वल ठिकाण

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ इगतपुरी तालुक्याच्या हद्धीवरील सह्याद्रीचा परिसर म्हणजे निसर्गाच्या विविध आविष्कारांनी व्यापून टाकलेला नयनरम्य भाग आहे. टाकेद परिसरातील अनेक गावे, आदिवासी वाड्या पाडे ह्याचे वर्षानुवर्षे साक्षीदार आहेत. असेच जैवविविधता टिकवून ठेवणारे इगतपुरी तालुक्यातील मायदरा हे छोटेसे पण टूमदार गाव सर्वदूर प्रसिद्ध आहे. मायदरा गावाला लागून सह्याद्रीचा भाग म्हणजे नळीच्या दऱ्यातील […]

शेळ्या, शाळा आणि पुन्हा शेळ्या असा दिनक्रम असणाऱ्या शेळ्यावाला शिक्षकाची यशोगाथा : इगतपुरी तालुक्यातील बिनपगारी शिक्षकामुळे मिळाला शेकडो लोकांना रोजगार

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक मोठ्या अपेक्षेने घेतलेले उच्चशिक्षण, त्याद्वारे मिळालेली शिक्षकाची बिनपगारी नोकरी आणि यामुळे स्वकीय लोकांकडून तिरकस मनोवृत्तीची मिळत असलेली वागणूक यामुळे व्यथित झालेल्या युवकाची यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहे. मागे वळून पाहतांना ह्या युवकाने इगतपुरी तालुक्यातील ५०० लोकांना हक्काचा आणि कायम उत्पन्न मिळवून देणारा रोजगार मिळवून दिला आहे.शिक्षक असूनही सकाळी ८ ते […]

नयनरम्य.. दिमाखदार आणि शाही थाटातील अभूतपूर्व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न : जनसेवा प्रतिष्ठान आणि घाटनदेवी ट्रस्टच्या संकल्पनेतून इगतपुरीत आयोजन

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ घाटनदेवी मंदिराचे पवित्र प्रांगण… सनई, चौघडी, वाजंत्री आणि मंगल वाद्यांचा निनाद… सदाबहार गीतांची रंगत..आली लग्नघटिका समीप नवरा…. सावधान …वाजंत्री सावधचित्त अशा अनेक मंगलाष्टकांची लयदार ललकारी… प्रतिष्ठित मान्यवरांचा आशीर्वाद आणि आयोजकांसह कार्यकर्त्यांची धावपळ… जेवणाची लज्जतदार मेजवानी… असा सगळा शाही सामुदायिक लग्नसोहळा पाहून वधुवरांच्या आईवडील, नातेवाईकांसह वऱ्हाडी मंडळींचे डोळे दिपले. […]

देशपातळीवरील सर्वोच्च सन्मानाने इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायत सन्मानित : जम्मू मधील कार्यक्रमातुन पंतप्रधान मोदींनी केले मोडाळेकरांचे कौतुक

झगमगाटी विकासापेक्षा समृद्ध विकासाची मूल्ये प्रत्येकांत रुजवा – सीईओ लीना बनसोड : मोडाळेकरांनी इगतपुरीची मान देशात उंचावली – आमदार हिरामण खोसकर भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ आपलं गाव डोळ्यासमोर ठेवून नुसता चकचकीत विकास न करता सर्वांगीण विकास साधून समृद्ध विकासाची नवी मूल्य विकसित करावीत. आपल्या गावाचे विविध विषयांतील गुणपत्रक वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. […]

“ध्येयापुढती गगन ठेंगणे” – सर्वोच्च ध्येय गाठवण्यासाठी अखंड परिश्रम करणारा संदीप डावखर : अल्पकाळात मिळवली डॉक्टरेट, वकिली आणि उच्च शिक्षणाची गुरुकिल्ली

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा कोणत्याही संकटकालीन परिस्थितीला सामोरे जात अनंत अडचणींच्या उरावर बसून यशाचा राजमार्ग मिळवणे ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. स्पर्धात्मक जीवनाशी दोन हात करतांना मनातले ध्येय उराशी बाळगून ते ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. यासह उत्तुंग स्वप्नांचे पूर्णत्व साध्य करतांना जनसेवेचा वारसा जपणे सुद्धा दिव्य असते. […]

इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे गाव झळकले देशपातळीवर : नवी दिल्लीच्या कार्यक्रमात यशोगाथेचे झाले देशभर प्रसारण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतंर्गत केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या शिरसाठे ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला. आज दुपारी संपूर्ण देशभरात स्वच्छ असणाऱ्या शिरसाठे ग्रामपंचायतीचे प्रसारण देशवासियांना पाहायला मिळाले. ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी ह्या कार्यक्रमात […]

नसानसात छत्रपतींचे विचार, श्वासाश्वासात समाजसेवा भरलेल्या रुपेश नाठे यांना आशिया खंडातील मानाचा पुरस्कार : विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन मिळाला सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० छत्रपती शिवरायांचे विचार दगडालाही मोती बनवु शकतात. ह्या विचारांच्या सुसंस्कारांची पेरणी प्रत्येक माणसात व्हावी. शिवरायांच्या विचारांसह सामाजिक कार्याचा ठसा उमटवावा. यासाठी इगतपुरी तालुक्यातील रुपेश हरिश्चंद्र नाठे हा ध्येयवेडा युवक झपाटून काम करीत आहे. संपूर्ण कुटुंब आणि सहकारी मित्रांसह कामाला झोकून घेतलेल्या ह्या युवकाच्या प्रेरणादायी कार्याची दखल आशिया खंड स्तरावरील संघटनेने घेतली […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोडाळे ग्रामपंचायतीला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार : राज्यातील १४ गावांमध्ये मोडाळे गावाची पुरस्कारासाठी निवड

गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोडाळे गावाची उत्तुंग भरारी इगतपुरीनामा न्यूज, दि. १० भारत सरकारच्या वतीने देशपातळीवर दिला जाणारा मानाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नाशिक जिल्ह्यात मोडाळे ग्रामपंचायतीला घोषित झाला आहे. 24 एप्रिलला देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे […]

घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये इगतपुरी तालुक्यातील पहिली ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी : आदिवासी तालुका आता आरोग्य क्षेत्रातही आघाडीवर असल्याचे सिद्ध

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ इगतपुरी ह्या आदिवासी बहुसंख्य तालुक्यात वैद्यकीय सोयीसुविधांची वानवा असल्याची हाकाटी सगळीकडे पिटली जाते. त्यामुळे गंभीर आजारांचा उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई, नाशिकला प्राधान्य दिले जाते. असे समज गैरसमज असले तरी त्यांना खोडून टाकण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल आघाडीवर आहे. ह्या हॉस्पिटलच्या सहयोगाने इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात आज […]

error: Content is protected !!