संजीवनी आश्रमशाळेत डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी शहरातील प्रथीतयश वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस संजीवनी आश्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. आश्रमशाळा प्रशासनाकडून यावेळी त्यांचे हृद्य सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी डॉ. परदेशी यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आश्रमशाळेमध्ये मिळत आहे, त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधाही […]

एकलव्य निवासी शाळेत कायम सामावून घेण्यासाठी शिक्षकांचे आमरण उपोषण सुरु

इगतपुरीनामा न्यूज – राज्यातील ३७ एकलव्य निवासी शाळेतील शिक्षकांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी या शाळेतील शिक्षक आज शिक्षक दिनापासून आपापल्या शाळेत आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि प्रकल्पाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राज्यात ३९ एकलव्य निवासी शाळा सुरु असून सरळ सेवा भरतीद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र […]

अशैक्षणिक कामे बंद करून शिकवण्याचे काम करू द्या ; विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या हातून घडूद्या : शिक्षकांकडून शिक्षक दिनी नाशिक जिल्हाभरात शासनाचा निषेध

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षकांना ज्ञानदानाच्या पवित्र कामापासून वंचित ठेवून प्रचंड शैक्षणिक कामांचा बोजा लादला जातो. शिकवण्याच्या कामापासून दूर ठेवण्याचे शासनाचे धोरण आणि काही लोकप्रतिनिधी शिक्षकांबद्दल सोशल मीडियातून अवमानकारक वक्तव्य करतात याच्या निषेधार्थ आज आंदोलन झाले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षकांनी शिक्षक […]

राज्यातील ३९ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या […]

इगतपुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मोडाळेच्या शिक्षिका माधुरी पाटील यांना राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार : राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी दिल्या शुभेच्छा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका माधुरी केवळराव पाटील यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील शाळांत त्यांनी प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांतील कलागुण ओळखत त्यांना तंत्रज्ञानाचे धडे […]

विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या : नाशिप्र मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक रक्षाबंधन साजरी केली. विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरा करता येत नाही म्हणून महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या विभागाला भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी राख्या बांधल्या. इगतपुरी रेल्वे पोलीस […]

राजमुद्रा मंडळातर्फे गोंदे दुमाला येथे उद्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सोहळा : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. डॉ देविदास गिरी यांचे मिळणार मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील राजमुद्रा सामाजिक शैक्षणिक मंडळातर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, होतकरू विद्यार्थ्यांसह सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हरी होम साई ढाबा संचालक अकबरशेठ पठाण यांच्या सौजन्याने व तरुणांचे आदर्श माजी अध्यक्ष संदीप नाठे व राजमुद्रातर्फे उद्या शनिवारी २६ ऑगस्टला हा कार्यक्रम […]

पवित्र पोर्टलला अद्याप मुहूर्त नाही.. शिक्षक भरतीचे भिजत घोंगडे !

इगतपुरीनामा न्यूज : राज्यात दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात जवळपास तीस हजार जागा भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्पष्ट केले होते. त्यासाठीचे वेळापत्रकही त्यांनी जाहीर करून 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट नंतर आज सहा […]

‘एक धागा शौर्याचा, एक राखी अभिमानाची’ उपक्रमातून टिटोली शाळेतर्फे सैनिकांना राख्या आणि शुभेच्छा पत्रे रवाना

इगतपुरीनामा न्यूज – देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या टिटोली येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेतील चिमुकल्या बहिण भावांनी भेटकार्ड व राख्या सीमेवर पाठवल्या आहेत. ‘एक धागा शौर्याचा, एक राखी अभिमानाची’ या विचारांना अनुसरून टिटोली येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक […]

खैरगावचे शिक्षक विलास गवळे यांना आयसीटीसी अंतर्गत ८ संगणक आणि लॅपटॉप : लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण आणि ग्रामस्थांनी केले विशेष कौतुक

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील शिक्षकांसाठी  असणाऱ्या आयसीटीसी कोर्ससाठी जिल्ह्यातील १ हजार १४८ नोंदणी केलेल्या शिक्षकांपैकी ५२४ शिक्षकांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केला. ह्यातील पहिल्या ७० शिक्षकांना प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये खैरगाव जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक विलास जगन्नाथ गवळे सरांनी यांनी उत्कृष्टपणे हा कोर्स पूर्ण करुन टॉप ३ मध्ये स्थान प्राप्त […]

error: Content is protected !!