संजीवनी आश्रमशाळेत डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी शहरातील प्रथीतयश वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस संजीवनी आश्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. आश्रमशाळा प्रशासनाकडून यावेळी त्यांचे हृद्य सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी डॉ. परदेशी यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आश्रमशाळेमध्ये मिळत आहे, त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. या सगळ्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे आवाहन डॉ. परदेशी यांनी यावेळी केले. वाढदिवसानिमित्त त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊसोबतच पंचवीस लेझीम संच भेट म्हणून दिले.

आर्किटेक्ट लेखराज परदेशी, संजय परदेशी, निर्मला परदेशी, संतोषी परदेशी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!