इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील राजमुद्रा सामाजिक शैक्षणिक मंडळातर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, होतकरू विद्यार्थ्यांसह सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हरी होम साई ढाबा संचालक अकबरशेठ पठाण यांच्या सौजन्याने व तरुणांचे आदर्श माजी अध्यक्ष संदीप नाठे व राजमुद्रातर्फे उद्या शनिवारी २६ ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक प्रा. डॉ. देविदास गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर प्रमुख पाहुणे म्हणून हजर असणार आहेत. यावेळी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विविध स्पर्धा परीक्षामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आयुष्यात चांगले नाव कमवून विद्यार्थ्यांनी भविष्यात देशासह समाजाची, गावाची सेवा करून इतरांसमोर आदर्श निर्माण व्हावा, गुणवंतांना प्रोत्साहन देऊन मनोबल वाढवण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. शिक्षक संघाचे नूतन जिल्हा सरचिटणीस निवृत्ती यशवंत नाठे, आदर्श शिक्षक हरिश्चंद्र रघुनाथ जाधव ह्या शिक्षकांचा यावेळी गौरव होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.
इयत्ता १० वीमधे सिद्धिविनायक विद्यालयात प्रथम क्रमांक कु. ज्योती भास्कर सोनवणे, द्वितीय कांचन दिलीप शेलार, तृतीय रोहिणी मोहन जाधव, चतुर्थ राणी लक्ष्मण राव, पाचवा क्रमांक गायत्री केरू ठाणगे, कुस्ती स्पर्धेत ८२ किलो गटात इगतपुरी तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात दुसरा कु. अनिकेत विश्वनाथ नाठे, २०० मीटर धावणे स्पर्धेत तालुक्यात प्रथम कु. पायल रोहिदास नाठे, १०० मीटर धावणे तालुक्यात प्रथम श्रवण बाळू मांडे, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. ज्योती भास्कर सोनवणे, द्वितीय कु. श्वेता विष्णू नाठे, तृतीय कृष्णा परमेश्वर नाठे, निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहिणी मोहन जाधव, द्वितीय राणी लक्ष्मण राव, तृतीय कांचन दिलीप शेलार यांच्यासह बारावी कला शाखेतील कु. रविना एकनाथ बोराडे, कु. कादंबरी यादव नाठे, वैभव राजेंद्र नाठे, धनंजय जानकीराम घाटेसाव, कु. साधना राजाराम नाठे, बारावी वाणिज्य शाखेतील कु. माया हिरामण कातोरे, कु. गायत्री वसंत पवार, कु. काजल अनिल गोऱ्हे, कु. वैष्णवी गणपत खांडबहाले, कु. प्रिया बाळू वाजे ह्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष संदीप नाठे, समाधान वारुंगसे, बंडु नाठे कु. मच्छिंद्र काळे, ऋषिकेश नाठे, राहुल नाठे, लखन नाठे, अजय नाठे, प्रकाश नाठे, रामेश्वर चाटे, अजय गुप्ता आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.