

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक रक्षाबंधन साजरी केली. विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरा करता येत नाही म्हणून महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या विभागाला भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी राख्या बांधल्या. इगतपुरी रेल्वे पोलीस ठाणे, इगतपुरी नगरपरिषद, इगतपुरी पोलीस ठाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, महसूल मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय आदी विभागातील अधिकाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. रेल्वे पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. प्रतिभा हिरे, समन्वयक डॉ. बाळू घुटे, प्रा. एल. एस. अहिरे, प्रा. पी. व्ही. सकट, प्रा. एस. आर. मुसळे, प्रा. डी.पी. तोटे आदींसह विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. जे. एल. सोनवणे यांनी केले.

