इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी समाजाशी घनिष्ठ संबंध, आक्रमक नेतृत्व, प्रश्न व समस्या सोडवण्याची हातोटी, युवकांशी दैनंदिन संवाद आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची क्षमता हे लकीभाऊ जाधव यांचे गुणवैशिष्ठ्य आहे. आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून देशपातळीवर पोहोचलेले हे युवा नेतृत्व युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून इंदिरा काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज – माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना मिळालेल्या आदिवासी विकास महामंडळ अध्यक्षपदाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा राज्यमंत्री दर्जा लाभला आहे. मात्र ह्या अध्यक्षपदामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघावरील उमेदवारीचा दावा काशिनाथ मेंगाळ यांनीही कायम ठेवला आहे. शिंदे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ना. […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील बहुचर्चित मतदारसंघ आहे. तीन पंचवार्षिक काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या ह्या मतदारसंघात ह्यावेळी विद्यमान काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी धक्कादायकरित्या महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे शिवसेना भाजपच्या इच्छुकांची चांगलीच गोची झाली. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना आदिवासी महामंडळ अध्यक्षपद देऊन तात्कालिक गाजर दाखवून संभाव्य बंडखोरी रोखली […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची उद्या शनिवार दि. १९ ला त्र्यंबकेश्वर येथे भव्य सभा होणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या ह्या सभेसाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ना. अजितदादा पवार यांचे […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्हीही तालुक्यात विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांमुळे पक्षाचा दबदबा वाढला आहे. येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने पक्षाने सांगितलेला उमेदवार निवडून आणून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना दिवाळी गिफ्ट देऊ अशी आनंदी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरी विधानसभा […]
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हा पक्ष नसून विकासाभिमुख विचारधारा आहे. ह्या विचारधारेतून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हा पक्ष बळकट झाला आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि त्यांच्या सोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ही घटना इगतपुरी मतदारसंघाच्या चांगल्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरीत एका पक्षाने मोठे केल्यानंतर त्या पक्षाला झुगारून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली जाण्याचा इतिहास आहे. आमदारकीसाठी असा आटापिटा ह्या मतदारसंघात बऱ्याचदा दिसतो. ह्या निवडणुकीसाठी पक्षांतराची स्थित्यंतरे घडायला सुरुवात झालेली आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल. यानंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीला वेग येणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दिग्गज पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मूळचे काँग्रेसचे पण शिक्षक मतदारसंघात शिवसेना उबाठाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे, त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जिल्हा परिषद […]
इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची सिन्नर दौऱ्यात माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ.श्रीराम लहामटे यांनी अजित दादांना बाळासाहेब झोले यांना उमेदवारी देण्यात यावी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सदर जागा सोडण्यात यावी अशी मागणी केली. […]
भास्कर सोनवणे – इगतपुरीनामा न्यूज – २००४ पूर्वीच्या काळात इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाचे भयाण वास्तव, पाण्यासाठी गावोगावी होणारा मायबहिणींचा आटापिटा, शिक्षणाच्या सोयीसुविधांचा अभाव, रस्ते आणि दळणवळणाच्या दरिद्री व्यवस्था, युवकांना स्वयंरोजगार आणि हक्काच्या रोजगारासाठी करावी लागणारी कसरत आणि भूमिपुत्र शेतकऱ्यांचा पिकांना पाणी द्या म्हणणारा आर्त टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. हे जळजळीत भयानक वास्तव […]