इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख येथील गोडाऊनच्या जवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने प्रतिकार केल्याने बिबट्याने ठेथुन धूम ठोकली. आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमाराला झालेल्या ह्या घटनेने नागरिकांत घबराट पसरली आहे. वर्दळीच्या महामार्गावर बिबट्याचा महिलेवर हल्ला झाल्याने पिंजरा लावावा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे अतिशय सन्मानाच्या दिल्या जाणाऱ्या “गोदावरी गौरव” पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते फोडसेवाडी येथील “वाघिण” सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. रोख २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. पुढील महिन्याच्या १० तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या ७ आरोपीना मुद्धेमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीमध्ये इगतपुरी इगतपुरी तालुक्यातील ३, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २ जणांचा समावेश असून एकूण ७ आरोपी आहेत. यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. २०१८ मध्ये इगतपुरी तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही मोठ्या हिमतीने काही आरोपींना जेरबंद केले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव परिसरातील गांगरवाडी येथे आज बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्यांची दहशत पहायला मिळत आहे. खेड येथील गांगरवाडी परिसरात वन विभागाने आज चार वाजेच्या सुमारास पिंजरा लावला होता. नंतर लगेचच संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी तालुक्यातील मुरंबी शिवारात असलेल्या भाऊसाहेब बोडके यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत. काल सायंकाळी व आज सकाळी ऊस तोडणी सुरू असताना अचानक बिबट्याचे बछडे आढळले. त्यामुळे ह्या परिसरात भीती पसरली आहे. भीतीमुळे खळबळ उडाली असल्याने वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. अद्याप बिबट्याची मादी दिसलेली नाही. बछड्यांच्या […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ “चार आण्यांची कोंबडी आणि बारा आण्यांचा मसाला” अशी म्हण सगळीकडे प्रचलित आहे. अर्थातच कोंबडीला शून्य किंमत देऊन तिचे मूल्य घटवण्यात आले आहे. असे असले तरी एक कोंबडी भल्याभल्यांना चांगलीच नडु शकते याची साक्षात प्रचिती इगतपुरी शहरात आली आहे. आजपर्यंत कोणीही न केलेला पराक्रम एका १०० रुपयांच्या कोंबडीने करून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 24 इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात बिबट्याचे २ बछडे जेरबंद करण्यात इगतपुरीच्या प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. १५ दिवसांपूर्वी २ बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर लावलेल्या एकाच पिंजऱ्यात २ बछडे अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैजअली […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी ( कळमुस्ता ) गावांत बालकांना बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. ह्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी दीपक राजभोज वनरक्षक संतोष बोडके, मंगेश शेळके, रत्ना तूपलोंढे, शोभा वाघचौरे यांच्या पथकाने ह्या भागात पाहणी केली. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० त्र्यंबकेश्वर जवळ कळमूस्ते दूगारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २ बालके जखमी झाले आहेत. ही घटनाआज पहाटे 6 वाजेच्या सुमाराला घडली. भिवाजी गोविंद सोहळे वय 12, विशाल सुरुम वय 8 हे दोघे पहाटे 6 वाजता लघुशंकेसाठी घराबाहेर आल्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने लोकांना पाहताच बिबट्या पळून गेला. दोघांना नाशिकच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ आज पहाटे इगतपुरी शहरात १ बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने समाधानाचे वातावरण असतांना सायंकाळी पुन्हा आनंदाची बातमी आली आहे. वन विभागाने लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात पुन्हा एक बिबट्या जेरबंद झाला आहे. आजच २ बिबटे अडकल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान घटनास्थळी इगतपुरी शहरातील कोणीही नागरिकांनी अजिबात गर्दी करू नये. गर्दीमुळे बिबट्या हिंस्त्र होऊ शकतो. […]