इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे विहिरीत पडलेल्या १ वर्ष वयाच्या नर बिबट्याला वाचवण्यात इगतपुरीच्या वन विभागाला यश आले आहे. आज रात्री ८ वाजता घडलेल्या ह्या घटनेने विहिरीजवळ लोकांची मोठी गर्दी झाली होती. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर, वनरक्षक फैजअली सय्यद, गौरव गांगुर्डे, गोरख बागुल, रेश्मा पाठक, मालती पाडवी, स्वाती लोखंडे, मुज्जू शेख आणि वन मजूर यांनी ह्या बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. वैद्यकीय तपासणी करून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती केतन बिरारीस यांनी दिली.