चिंचलेखैरे भागात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती : वन खात्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

इगतपुरीपासून 6 ते 7 किमीच्या अंतरावर असलेल्या चिंचलेखैरे भागातील गावठा परिसरात रात्री शेतातील झापावर झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून जंगलात फरफटत नेले होते. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसविले होते. काल रात्री हा बिबट्या पुन्हा त्या झापावर भक्ष्याच्या शोधात आला असता ट्रॅप कॅमेऱ्यात तो कैद झाला.  हा परिसर वन विभागात असल्याने बिबट्याचा वावर हा स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहे. स्थानिकांनी बिबट्यासंदर्भात काय दक्षता घ्यावी याची माहिती वनविभाग जनजागृती करत देत आहे.

बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. शिकारीसाठी त्याने गावातील व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर हल्ला करण्याचा धोका सर्वाधिक आहे. तर याच परिसरातील काही आदिवासी पाड्यात मोजकीच घरे असल्याने त्यांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याच्या वावर असल्याने लहान मुलांना घराबाहेरही सोडता येत नसल्याचे पालकांनी सांगितले. बिबट्या कधी पकडला जातोय याकडे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!