इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ इगतपुरी शहर परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर आज पहाटे पिंजऱ्यात अडकला. सह्याद्रीनगर भागात २ दिवसांपूर्वी एक व्यक्तीवर हल्ला करून जखमी करणारा हा बिबट्या आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ह्या परीसरात अजूनही एक बिबट्या असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने पिंजरा लावला आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ दिवाळीत बिबट्याची दहशत कमी झालेली असतानाच आज पुन्हा इगतपुरी शहरात बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करून पुन्हा दहशत वाढवली आहे. आज पहाटे साडेपाच वाजता झालेल्या ह्या घटनेने इगतपुरी शहरातील सह्याद्रीनगर भागात खळबळ माजली आहे. यापूर्वी पिंजरे लावूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने नागरिकांत भीतीचे सावट आहे. तातडीने ह्या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्या अखेर मरण पावला. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. विशेष करून नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर या परिसरात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. यातील काही बिबट्याना जेरबंद करण्यात आले आहे तर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते भागातील दरेवाडी, फोडसेवाडी येथे १५ दिवसांपासून चकवा देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आज अखेर यश आले. ह्या भागातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. 10 वर्षीय बालकाचा बळी आणि 6 वर्षीय बालकाला जखमी करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकल्याने वन विभागाने समाधान व्यक्त केले. वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या […]
निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यासह विविध भागात बिबटे मानवी वस्तीत निदर्शनास येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार वन्य प्राण्यांपासून बचाव आणि सावधानता पाळण्यासाठी वनविभागाच्या पश्चिम विभाग इगतपुरी अंतर्गत सर्व गावांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे. नागरिकांकडून जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी […]
इगतपुरी तालुक्यात निर्माण होतेय भयमुक्त वातावरण इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यातील बिबट्या आणि वन्य प्राण्यांबाबत इगतपुरी तालुक्याचे वन खाते योग्य ते काम करीत आहे. संपूर्ण पथकाच्या समन्वयाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांनी विनाकारण बिबट्याच्या वास्तव्य असणाऱ्या भागात जाऊ नये. रात्रीच्या वेळी विनाकारण जंगली भागात आणि पिंजरे लावलेल्या भागात फिरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ इगतपुरी तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीबाबत आवश्यक उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्र्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने वन अधिकाऱ्यांना भेटून सविस्तर चर्चा केली. आमदारांचे स्विय सहाय्यक संदीप डावखर यांनी इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांची भेट घेतली. आजपर्यंत बिबटे पकडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कशा पद्धतीने केल्या, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इगतपुरी शहर, काळूस्ते, पिंपळगाव मोर भागातील बिबट्याचे लोन आता पूर्व भागातील कुऱ्हेगाव येथे येऊन पोहोचले आहे. ३ दिवसांपूर्वी अशोक बाबुराव धोंगडे यांच्या वासरावर सायंकाळी ६ वाजता हल्ला करून बिबट्याने गंभीर जखमी केले. अशोक धोंगडे यांचा मुलगा संजय धोंगडे याने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. वासरावर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याबाबत पोलीस […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इगतपुरी तालुक्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात हल्ले देखील होत आहे. तसेच काही नागरिकांना बिबट्यांचा हल्ल्यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तालुक्यात सर्वच ठिकाणी भात सोंगण्या सुरू असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तालुक्यात बिबटे संचार क्षेत्रात पिंजरे लावून नरभक्षक बिबट्यांना तातडीने जेरबंद […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ प्रगतिशील लेखक संघ त्र्यंबकेश्वर शाखेचा साहित्य मेळावा मुरंबी येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी सवाद्य पुस्तकदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन पाच धान्याची पूजा म्हणजे धानपूजेने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कादंबरीकार राकेश वानखेडे होते. ते म्हणाले की, “जोपर्यंत तुम्हाला शोषण कळत नाही, तोपर्यंत साहित्यिकांच्या साहित्याला अर्थ नाही. शोषण समजून घेणे व ते साहित्यातून […]