ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
आंबोली येथे दुपारच्या सुमारास बबन लक्ष्मण मेढे हे आपल्या शेतात पाणी भरत असताना साधारण एक महिन्याचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले. पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढेपाटील यांनी वनरक्षक नवनाथ गोरे यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे श्यामराव गायकवाड, नवनाथ गोरे, कैलास महाले तात्काळ जागेवर जाऊन पिल्लाची खात्री करण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लू लहान असल्यामुळे त्याला त्याचे आईचे ताब्यात देण्याचे ठरवले. त्यानुसार Eco Eco foundation चे सभासद अभिजित यांचेशी संपर्क करून पिल्लास सुरक्षितरित्या शेतात ठेवले. बिबटआई रात्री पिल्लाला घेऊन गेले. सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. अश्या प्रकारे बिबट्याच्या पिल्लाला सुखरूप त्याच्या आईकडे देण्यात आले. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे काहीप्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे,