बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे इगतपुरी तालुक्यातील ३, त्र्यंबक तालुक्यातील २ आरोपींसह ७ आरोपी घोटीजवळ जेरबंद : शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत मुद्देमालासह ४ मोटरसायकली ताब्यात

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या ७ आरोपीना मुद्धेमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीमध्ये इगतपुरी इगतपुरी तालुक्यातील ३, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २ जणांचा समावेश असून एकूण ७ आरोपी आहेत. यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. २०१८ मध्ये इगतपुरी तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही मोठ्या हिमतीने काही आरोपींना जेरबंद केले होते.

ह्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 19 जानेवारीला वनपरिक्षेत्र वाशाळामधील वाशाळा गावाचे परिसरात वन्यप्राणी बिबट्याच्या कातड्याचा व्यापार होत असल्याच्या गुप्त बातमीवरून शहापूर वनविभागाने सापळा रचला. ह्या सापळ्यात शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन्य प्राणीमित्र संतोष जगदाळे यांनी बनावट ग्राहक बनून आरोपींना संपर्क केला. आरोपींनी भेटण्याचे ठिकाण वाशाळा इथून बदलून इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी मंदिर परिसरात भेटण्याचे ठरविले. तेथे त्यांना बिबट वन्य प्राण्याचे कातड्याची मोबाईल वर व्हिडिओ दाखवून त्याचा व्यवहार करायचा असल्याचे सांगितले. परंतु त्या दिवशी आरोपींनी व्यवहार केला नाही. त्यानुसार 19 जानेवारीपासून गुन्ह्यात सहभागी आरोपींनी बनावट ग्राहकाला मोबाईलवर कॉल करून बिबट वन्य प्राणी कातड्याची विक्री करण्याचे ठरविले. त्यानुसार काल 2 फेब्रुवारीला बिबट वन्य प्राण्याचे व्यवहारासाठी पहिल्यांदा घाटन देवी मंदिर परिसरात ठरले. यानंतर लगेच ठिकाण बदलून इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत ठरले. त्यानुसार शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाशाळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल गोदडे, खर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख, शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी संयुक्त सापळा रचला. बनावट ग्राहक बनून आरोपी समोर उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत गेले असता बिबट वन्य प्राणीचे कातड्याचा व्यवहार करताना ७ आरोपी आढळले. त्यांच्याकडे बिबट वन्य प्राण्यांचे कातडे नग 1 आणि ४ मोटरसायकली या मुद्देमालासह त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ह्या सापळ्यात आरोपी काळु सोमा भगत वय 36 रा. भावली ता. इगतपुरी जि. नाशिक, अशोक सोमा मेंगाळ वय 29 रा भावली ता. इगतपुरी. जि. नाशिक, योगेश लक्ष्मण अंदाडे. वय 26 रा. फांगुळगव्हाण ता. इगतपुरी जि. नाशिक, मुकुंदा सोमा सराई. वय 55 रा अस्वली हर्ष ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, गोटीराम एकनाथ गवारी वय 34 रा. सामोडी ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, रघुनाथ शंकर सातपुते वय 34 रा. मोखाडा ता. जव्हार जि पालघर, अर्जुन गोमा पानेडा. वय 28 रा. चाफ्याचापाडा ( शिरोळ ) ता. शहापुर जि. ठाणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ह्या आरोपींवर वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम ०९, ४४, ४८ (ए) अन्वये वाशाळा रा. गु. क्र .WL- 01/2021-2022 अन्वये गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. संयुक्त सापळा कारवाईत वनपाल एन. एस. श्रावणे, व्ही. एस गायकवाड, एस. बी. गाठे, वनरक्षक वाय. पी. पाटील, पी. डी. बेलदार, जी. एस. भोये, एस. एल. शिंदे, बी. पी. वसावे, एस. एस. अहिरे, डी. डी. ठोंबरे, यु. एम. घायवट, बी. एस. शेळके, व्ही. व्ही. खेडकर, आर. एन. मागी, जी. एस. खेमनर, एस. डी. धोंगडे, एम. टी. ओतडे, डी. पी. ऐवळे, सी. एस. खाडे, आर. एन. देवकत्ते, आर. एस. महाले यांनी सहभाग घेतला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!