इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
वाडीवऱ्हे येथे चार दिवसात बिबट्याने दोन हल्ले केले आहेत. त्यात वाडीवऱ्हे येथील अमोल गवते वय २४ या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर तो जखमी झाला आहे. परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ह्या भागातील बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा ह्या मागणीचे निवेदन त्यामुळे मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे यांनी इगतपुरी वनविभागाला दिले आहे. त्यात शेतकऱ्यांच्या वीज पंपाची लाईट रात्री येत असल्याने शेतकरी रात्री शेतीसाठी शेतात जात असतो. अशावेळी ह्या घटना होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण आहे. वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपाल ढोन्नर यांनी लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा असे निवेदनात नमूद आहे.