अन्य तालुक्यातील बिबटे इगतपुरी तालुक्यात सोडल्याने चिंचलेखैरे येथील महिलेचा बळी : इगतपुरी वन विभागाकडून तातडीने कार्यवाही सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी तालुक्यात बिबट्यामुळे अनेक घटना वाढत आहेत. वन विभागाच्या अन्य तालुक्याच्या हद्दीतील पकडलेले बिबटे इगतपुरी तालुक्यात सोडले जात असल्याची लोकांना शंका आहे. असे सोडलेले बिबटे आक्रमक होत असल्याने नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडतात. अशाच एका घटनेत चिंचलेखैरे येथील ५५ वर्षीय महिलेला बिबट्याने खाल्ल्याची घटना आज उघडकीस आली. याबाबत माहिती समजताच इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांनी पथकासह भेट देऊन माहिती घेतली. संबंधित कुटुंबाला नियमाप्रमाणे योग्य ते साहाय्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथील शकुंतला अमृता रेरे वय ५५  ही महिला चिंचलेखैरे पैकी गावठा भागात मालकी गट नंबर २०५ मध्ये झोपडीमध्ये राहते. शनिवारी रात्री झोपेत असताना तिला ५०० मी अतंरावर बिबट्याने ओढत नेले. ह्या महिलेचा छाती पासुन डोक्यापर्यंत पूर्ण भाग बिबट्याने खाल्ला आहे. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असून संबंधित महिलेच्या कुटुंबाला योग्य ते साहाय्य करण्यात येणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!