इगतपुरीनामा न्यूज, दि. 15 गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरी, नाशिक, ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचला. पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर दोन संशयित मोतीराम महादू खोसकर वय ३५, रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर ), सुभाष रामदास गुंबाडे वय ३५, रा. पाटे, ता. पेठ यांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी रंगेहाथ ताब्यात घेतले. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी इगतपुरी वन विभागाने जोरदार तपास सुरु केला आहे. संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या राहत्या आदिवासी पाड्यावर जाऊन सखोल तपास करण्यात आला. त्यामध्ये चिंचतारा ता. मोखाडा, जि. पालघर ह्या गावाच्या शिवारातील जंगलात खोदकाम करत बिबट्याची दडवून ठेवलेली अन्य अवयव व हाडे जप्त केली. दरम्यान मृत झालेला बिबट्या व […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने मोठी कामगिरी केली असून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आज झालेल्या कारवाईमध्ये इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी मोठी कामगिरी केली. वन अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधला. त्या व्यक्तींनी ह्या व्यवहातसाठी 17 लाख रुपयांमध्ये […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांच्या सातपूर अशोकनगर येथील बंगल्याच्या बाल्कनीत बिबट्या आढळून आला आहे. पंढरीनाथ काळे यांच्या ‘शिवतीर्थ’ बंगल्याच्या बाल्कनीत आज सकाळी बिबट्या दिसल्याने पंढरीनाथ काळे यांनी सांगितले. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाचे पथक दाखल झाले असून अडीच तासांपासून रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला एमआयडीसी भागात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने उडवले आहे. ह्या अपघातात बिबट्या जागीच ठार झाला आहे. आज रात्री ११ च्या सुमाराला ही घटना घडली आहे. लिअर कंपनीच्या परिसरातून रस्ता ओलांडत असतांना बिबट्याला वाहनाने धडक दिल्याने बिबट्या ठार झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इगतपुरीचे वन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे विहिरीत पडलेल्या १ वर्ष वयाच्या नर बिबट्याला वाचवण्यात इगतपुरीच्या वन विभागाला यश आले आहे. आज रात्री ८ वाजता घडलेल्या ह्या घटनेने विहिरीजवळ लोकांची मोठी गर्दी झाली होती. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर, वनरक्षक फैजअली सय्यद, गौरव गांगुर्डे, गोरख […]
ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ आंबोली येथे दुपारच्या सुमारास बबन लक्ष्मण मेढे हे आपल्या शेतात पाणी भरत असताना साधारण एक महिन्याचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले. पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढेपाटील यांनी वनरक्षक नवनाथ गोरे यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे श्यामराव गायकवाड, नवनाथ गोरे, कैलास महाले तात्काळ जागेवर जाऊन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ वाडीवऱ्हे येथे चार दिवसात बिबट्याने दोन हल्ले केले आहेत. त्यात वाडीवऱ्हे येथील अमोल गवते वय २४ या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर तो जखमी झाला आहे. परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ह्या भागातील बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा ह्या मागणीचे निवेदन त्यामुळे मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ इगतपुरीपासून 6 ते 7 किमीच्या अंतरावर असलेल्या चिंचलेखैरे भागातील गावठा परिसरात रात्री शेतातील झापावर झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून जंगलात फरफटत नेले होते. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसविले होते. काल रात्री हा बिबट्या पुन्हा त्या झापावर भक्ष्याच्या शोधात आला असता ट्रॅप कॅमेऱ्यात तो […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ इगतपुरी तालुक्यात बिबट्यामुळे अनेक घटना वाढत आहेत. वन विभागाच्या अन्य तालुक्याच्या हद्दीतील पकडलेले बिबटे इगतपुरी तालुक्यात सोडले जात असल्याची लोकांना शंका आहे. असे सोडलेले बिबटे आक्रमक होत असल्याने नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडतात. अशाच एका घटनेत चिंचलेखैरे येथील ५५ वर्षीय महिलेला बिबट्याने खाल्ल्याची घटना आज उघडकीस आली. याबाबत माहिती समजताच इगतपुरीचे […]