नागपंचमी विशेष : विषाची परीक्षा आणि साक्षात मृत्यूचे दर्शन घडवणारा अघोरी खेळ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ साप म्हटला की अनेकांना दरदरून घाम फुटतो तर काहींची बोबडी वळते. यापूर्वी सापांविषयी अनेक गैरसमज असल्याने ‘दिसला की ठेचला’ या वृत्तीने मारले जायचे. सापांविषयी गैरसमज दूर व्हावेत, लोकांचे प्रबोधन व्हावे आणि सापांना जीवदान मिळावे यासाठी मध्यंतरी सर्पमित्रांनी मोहीम हाती घेऊन सर्प वाचविण्यासाठी प्रयत्न केलेत. या मेहनतीचे फळ आता ग्रामीण भागात दिसू […]

भावली धरणात आंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून : प्रशासनाच्या साहाय्याने शोधकार्य सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आंघोळीसाठी गेलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. चार मित्रांच्या सोबत धरणात हा युवक बुडाल्याने मित्रांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. अखेर प्रशासनाला माहिती देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन टीम आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या पथकातर्फे शोधकार्य सुरु […]

पाऊस खुणावतोय..
काय झाडी.. काय डोंगर.. काय धबधबे!
निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या इगतपुरीतली ही खास ठिकाणे खास आपल्यासाठी!

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला इगतपुरी तालुका हा निसर्ग सौंदर्याची खाण आहे. डोंगर दऱ्या, झाडी, धबधबे आणि विशाल धरणे ही पावसाळी पर्यटनाची खास ठिकाणं पर्यटकांना सतत आकर्षित करत असतात. निवृत्ती नाठे यांच्या कॅमेऱ्याने टिपलेली मॉन्सून टुरिझमची ही खास सफर व्हिडिओच्या माध्यमातून खास आपल्यासाठी.. 1अमेझॉनच्या जंगलाचा अनुभवhttps://youtu.be/7fRvRIxDXV0 2 कुरुंगवाडी धबधबाhttps://youtu.be/s8b1nwAthV0 3 देव बांध धबधबाhttps://youtu.be/INMtfKnRcEI 4 गडद धबधबाhttps://youtu.be/Q2wivhX0Oxc […]

वनमहोत्सव : इगतपुरी वनविभागाकडून ५० हेक्टर क्षेत्रात १ लाख २० हजार वृक्षांची यशस्वी लागवड : भंडारदवाडी वन परिक्षेत्रात लोकसहभागातून झाडांची लागवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० तापमानात होत असलेली वाढ, बदललेले निसर्गचक्र अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी आणि दुष्काळ या माध्यमातून निसर्ग प्रत्येकाला अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाजी गरज असल्याचे इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रात वन महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे […]

त्रिंगलवाडी किल्ल्यावर वन विभागाकडून गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी निर्बंध : गैरप्रकार आढळल्यास इगतपुरी वन विभागाकडून होणार कारवाई

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. धरण परिसर…निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई…मंद मंद धुंद करणारा पाऊस…क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण असते. पावसाळ्यात तर विविध ठिकाणी डोंगर ऊतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांसह गड किल्यावर ट्रॅकींग करण्यासाठी ट्रेकिंगविरांची इकडे गर्दी वाढत असते. त्यासोबत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रसिद्ध त्रिंगलवाडी किल्ला […]

भावली, कुरुंगवाडी पर्यटनक्षेत्रात वन विभागाच्या गस्ती पथकाकडून पर्यटकांचे समुपदेशन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ इगतपुरी तालुक्यातील भावली व कुरुगंवाडी या पर्यटन भागात पर्यटकांचा जास्त ओढा आहे. सध्या जास्त पाऊस सुरु असल्याने ह्या भागात पर्यटकांची संख्या वाढतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या जीवाला धोके उद्भवू नये म्हणून नाशिकच्या वन विभागाने बंदीचा आदेश काढलेला आहे. ह्या अनुषंगाने इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाची अंमलबजावणी […]

इगतपुरी त्र्यंबकेश्वरमधील पर्यटनबंदीमुळे आदिवासी आणि स्थानिकांच्या रोजगारावर दुष्परिणाम : तातडीने पर्यटनबंदी मागे घेण्याची माजी आमदार निर्मला गावित यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसाळी हंगामामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांची प्रचंड गर्दी मुंबई व नाशिक शहरातुन फार मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यात शनिवारी व रविवारी गर्दी होत असते. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र पर्यटकांना मज्जाव केल्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. यासह पोलीस […]

इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पर्यटनस्थळे आणि गडकिल्ल्यांवर पर्यटकांना वन विभागाकडून बंदी : नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ सगळीकडे सध्या अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी जास्त प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाशिक पश्चिम विभागाच्या अधिनस्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरीहर, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा, इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व गडांवर आणि सर्व पर्यटन स्थळी […]

कांचनगावच्या माळरानावर फुलली शेकडो फळझाडे आणि फुलझाडे : आषाढीनिमित्त वृक्षलागवड आणि संवर्धन करणाऱ्या गव्हाणे कुटुंबाचे व्रत प्रेरणादायक

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १० इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील गव्हाणे परिवाराने आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी झाडांची लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याचे घेतलेले व्रत अखंड सुरु आहे. उजाड आणि निरूपयोगी माळरानावर लावलेल्या शेकडो उपयुक्त वृक्षांचे संगोपन गव्हाणे परिवार निष्ठेने करीत आहे. वृक्षवल्ली साक्षात परमेश्वर असून ही मौलिक संपदा पांडुरंगस्वरूप आहे असे मानणाऱ्या ह्या […]

१५ वर्षांपासून वारकरी पताका खांद्यावर घेऊन आषाढी वारी करणारे उत्तमराव झनकर : आळंदी ते पंढरपूर दिंडीत सहभाग घेऊन घेतात वारीचा आनंद

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ भेटी लागे जिवा लागलीसे आस”  या अभंगाप्रमाणे विटेवर उभ्या असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस आषाढी एकादशीच्या निमित्ताने सदैव वारकऱ्यांना नेहमीच लागलेली आहे. या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतलेले माजी सरपंच उत्तमराव झनकर ओळखले जातात. ते गेल्या १५ वर्षांपासून त्यांची पत्नी सौ. रंजना […]

error: Content is protected !!