इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्यातील भावली व कुरुगंवाडी या पर्यटन भागात पर्यटकांचा जास्त ओढा आहे. सध्या जास्त पाऊस सुरु असल्याने ह्या भागात पर्यटकांची संख्या वाढतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या जीवाला धोके उद्भवू नये म्हणून नाशिकच्या वन विभागाने बंदीचा आदेश काढलेला आहे. ह्या अनुषंगाने इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भावली, कुरुंगवाडी या भागात गस्त केली. यावेळी पर्यटकांना माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले. पर्यटकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रतिसाद दिला. पश्चिम भाग नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या आदेशान्वये इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली खैरगांवचे वनपरिमंडळ अधिकारी पी. के. डांगे, वनरक्षक पी. जी. साबळे, एम. बी. धादवड, एम. एस. सोनवणे, व्ही. पी. गावंडे, वाहनचालक मुज्जू शेख यांचा गस्ती पथकामध्ये समावेश होता.