त्रिंगलवाडी किल्ल्यावर वन विभागाकडून गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी निर्बंध : गैरप्रकार आढळल्यास इगतपुरी वन विभागाकडून होणार कारवाई

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

इगतपुरी तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. धरण परिसर…निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई…मंद मंद धुंद करणारा पाऊस…क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण असते. पावसाळ्यात तर विविध ठिकाणी डोंगर ऊतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांसह गड किल्यावर ट्रॅकींग करण्यासाठी ट्रेकिंगविरांची इकडे गर्दी वाढत असते. त्यासोबत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रसिद्ध त्रिंगलवाडी किल्ला हा पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना कायमच आकर्षित करत असतो. परंतु यावर्षी अति पाऊस असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरुन या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये म्हणून इगतपुरी वनविभागाने वेळीच पाऊले उचलुन पर्यटनासाठी व गड किल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना तात्पुरती बंदी घातली आहे. म्हणुन पर्यटनासाठी पुढील आदेशापर्यंत त्रिंगलवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणीही काही गैरप्रकार करताना आढळून आल्यास अशा पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपरीमंडळ अधिकारी सचिन दिवाने यांच्यासह कोरपगावचे वनरक्षक गाडर यांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!