भावली धरणात आंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून : प्रशासनाच्या साहाय्याने शोधकार्य सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आंघोळीसाठी गेलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. चार मित्रांच्या सोबत धरणात हा युवक बुडाल्याने मित्रांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. अखेर प्रशासनाला माहिती देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन टीम आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या पथकातर्फे शोधकार्य सुरु आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की इगतपुरी जवळ असणाऱ्या एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील सोनू सांगळे हा काम करतो. त्याचे सोबत काम करणारे सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित यांचे सोबत जवळ असणाऱ्या जांमुंडे गावाच्या परिसरात जेथे भावली धरणाचे बॅकवाॅटर आहे याठिकाणी दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते. यापैकी सुनील सोनू सांगळे याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा व इगतपुरीच्या महिंद्रा कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापनटीम सुनील सांगळे यांच्या शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस आणि प्रशासनाने ह्याबाबत नोंद घेतली असून शोधकार्य सुरु करण्यात आलेले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!