राजकीय भूकंपाने इगतपुरीत खळबळ ; शिवसेना उबाठाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि पदाधिकारी हाती घेणार भाजपाचे कमळ 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गेली तीस वर्ष नगरपालिकेवर एक हाती सत्ता ठेवणारे शिवसेना (उबाठा) गटाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. माजी नगराध्यक्ष नईम खान आणि माजी नगरसेवकांसह मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. इंदुलकर यांच्या निर्णयाने इगतपुरी शहरातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. निवडणुक रणसंग्रामात आता समीकरणे बदलली आहेत. उबाठा शिवसेनेचे इगतपुरीतील अस्तित्व संपल्यात जमा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!