वाडीवऱ्हे गटाच्या विकासासाठी डॉ. शरद तळपाडे हा समर्थ आणि सक्षम पर्याय : मिनी मंत्रालयातून वाडीवऱ्हे गटाचा चेहरामोहरा बदलवणार – डॉ. शरद तळपाडे

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – भूमिहीन होत चाललेला वाडीवऱ्हे गट हा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. अनेकांना उदरनिर्वाहासाठी साधन नसल्याने शिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र यावर पुढाकार घेऊन जनसामान्यांचे प्रश्न सोडवायला कुणीही पुढे येत नाही. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभ्यासु व उच्चशिक्षित उमेदवार म्हणुन डॉ. शरद तळपाडे यांच्याकडे पाहिले जाते. आपणही या प्रश्नांसाठी जाणीवपूर्वक बांधील असल्याचे डॉ. शरद तळपाडे सांगतात. यासाठी ह्या गटातून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचा वाडीवऱ्हे गट हा १ महामार्ग, १ राज्यमार्ग व रेल्वेलाईनसह विविध शासकीय प्रकल्पांनी अल्पभूधारक बनलेला आहे. वाडीवऱ्हे गटातून सद्यस्थितीतही वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन सुरुच आहे. असे असतांनाही तालुक्यातील कुणी लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज उठवला नाही. केवळ इतकेच नाही तर गेल्या चार वर्षांपासून अस्वली येथील उंडओहोळ नदीपत्रावरील अर्धवट पुल होतच नाही. यामुळे पावसाळ्यात हा मार्गच बंद होतो. गटात असे अनेक प्रश्न आ वासुन उभे आहे. अशा अनेक प्रश्नांवर शासनदरबारी आवाज उठवुन ते तडीस नेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून डॉ. शरद तळपाडे यांची उमेदवारी असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालयच आहे. या मंत्रालयातून गटाचे अनेक वर्षांपासून प्रलंबीत प्रश्न सोडवुन जनतेला न्याय, हक्क मिळवुन देण्यासाठी  अभ्यासु डॉ. शरद तळपाडे यांची गरज आहे. त्यासाठी मी बांधील असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यांना यासाठी जिल्हा परिषदेवर पाठवायचेच असा ठाम विश्वास त्यांचे समर्थक व वाडीवऱ्हे गटातील मतदार सांगतात. त्यांच्या रुपाने जिल्हा परिषदेत व शासन दरबारी भांडून वाडीवऱ्हे गट सर्वांगीण विकासाकडे नेण्यासाठी डॉ. शरद तळपाडे यांची गरज असल्याचे त्यांचे समर्थक व मतदार यांनी आवर्जुन सांगितले.

error: Content is protected !!