
शब्दांकन : दत्तात्रय गुंजाळ, विधानसभा प्रमुख, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, शिवसेना
सामाजिक कार्य करताना लहान किंवा माेठा, जात-पात, धर्म न बघता कार्य करत राहणे व आपल्याहातून जनहितार्थ मदत कशी हाेईल याचे बळकडून ज्यांना लहानपनापासून आई-वडिलांकडूनच मिळाले व लहान मुलापासून ते माेठया पर्यंत आवडणारे व्यक्तीमत्व म्हणजे तानाजी रूमणे हे घाेटी शहरातील सर्व परिचीत व्यक्तीमत्व ठरले आहे. पुढारी नकाे, जनसेवक हवा आहे ही नागरिकांच्या मनातील सद्य परिस्थिती असून जनसेवकाची ही छबी तनाजी रूमणेंच्या रुपात नगरिकांना दिसत आहे. तानाजी रुमणे यांचे जन्मगाव हे घाेटीच असून त्यांचे लहानपण हे घाेटीतील गल्लीबाेळात वाढत गेले आहे. घाेटी शहर हे इगतपुरी तालुक्यातील माेठी बाजारपेठ म्हणुन ओळखले जाणारे शहर असून येथे सर्व समाजातील नागरिक एकत्रित येऊन व्यापार करतात. येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारासाठी काेणत्या समस्यांना ताेंड द्यावे लागते हे लहानपणापासून तानाजी रुमणे यांनी अगदी जवळून बघितले आहे. आजपर्यंत त्यांनी घाेटीत राहुन अनेक नागरिकांच्या समस्या साेडविल्या व त्यांना न्याय मिळवून दिला आहे.

सरकारी याेजना असाे वा वैद्यकीय सेवा असाे यात तानाजी भाऊ सर्वात पुढे आग्रही असतात. त्यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित हाेऊन शिवसेनेत शिवसैनिक म्हणुन पक्षाचे धाेरण २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हे समीकरण जुळवत आजपर्यंत कामे करत आले आहे. त्यांनी शेकडाे महिलांना लाडकी बहिण याेजनेचे महत्व समजुन देत ठिकठिकाणी कॅम्प घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहिण याेजनेचा लाभ महिला वर्गाला मिळून दिला. घाेटी येथे कामगार, मजुर वर्ग जास्त प्रमाणात आहे त्यांना शासकीय याेजनेचा लाभ कसा घ्यावा व त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील यांची माहिती देत सदैव मदत करत आले आहेत. रक्तदान शिबीरासह वृध्दांसाठी माेतीबिंदु शिबीर असाे यांसारख्या अनेक सलाेख्याचे शिबीरांचा लाभ येथील नागरिकांना अगदी माेफत उपलब्ध करून देण्याचे काम तानाजी भाऊच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजासाठी आपण कुठेही मागे हटणार नाही व पुढील पिढीच्या भविष्यासाठी मराठा याेध्दा मनाेज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदाेलनात आपला छाेटासा खारीचा वाटा म्हणुन तानाजी रूमणे हे एक मराठा, लाख मराठा म्हणुन उभे राहत आले आहे
तसेच गाे-रक्षक म्हणून ही तानाजी भाऊंची ओळख असून ते गाेमातेच्या रक्षणासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात, अनेक गाे-शाळांना त्यांचेकडून नेहमीच माेठ्या प्रमाणात मदत देखील हाेत आहे. सण असाे वा उत्सव यामध्ये तानाजी भाऊंचा खारीचा वाटा असताे. बालाजी मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव व नवरात्राेत्सव हे माेठ्या दिमाखाने साजरा करण्यात येतात. नुकतेच लाेकमत समुहाकडून त्यांना उद्याेगरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. उद्याेग करत असतांना आपण समाजाचे काही देणे लागताे म्हणून आपल्या उद्याेगाच्या बळावर हा उद्याेगरत्न आता समाजसेवकाच्या वाटेवर उभा आहे. नुकत्याच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घोटी बुद्रूक गटातून तानाजीभाऊ इच्छुक उमेदवार असल्याने त्यांना जनतेकडून खुप सारा प्रतिसाद मिळत आहे. जेष्ठ नागरिक व महिला मंडळांनी तानाजी भाऊंसाठी आताच प्रचाराची सुरूवात केली आहे की, काय असे येथील परिसरात दिसून येते. याचे कारण म्हणजे तानाजी रूमणे यांनी आज पर्यंत केलेल्या कामाची रूपरेषा आता जनसेवकाच्या रूपात उमटावी याकरिता घाेटी शहरातील नागरिकांचा माेठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. तानाजी भाऊंचा मित्र परिवार हा त्यांच्या पाठीशी माेठ्या संख्येने उभा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तानाजी रूमणे यांचा विजय नक्कीच हाेईल यांची ग्वाही जनसामान्यांतून दिसत आहे. अशीच जनसेवा तानाजी भाऊंकडून हाेत रहावी हीच सदिच्छा!
