भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा सन्मान महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांना आज लाभला. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच 86 हजार 581 मतांनी त्यांनी अभूतपूर्व विजय संपादन केला. महाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षांची आणि अन्य कोणाचीही सोबत नसतांना काँग्रेसचे लकीभाऊ जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तुलनेने अतिशय नवखे, गरीब […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या हिरामण खोसकरांनी दुसऱ्यांदा विजय संपादन केला. त्यांनी 86 हजार 581 मतांनी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांचा पराभव केला. लकीभाऊ जाधव यांना 30 हजार 707 मते मिळून ते दुसऱ्या स्थानावर राहिले. अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांना 23 हजार 776 मते, मनसेचे […]
Live अपडेट – राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर यांचा विजय घोषित होणे बाकी.
इगतपुरीनामा न्यूज – राज्यभरात आज एकाच वेळी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी मतदारांची संख्या वाढली आहे, ही सकारात्मक बाब असली तरी मतदार संख्या वाढल्याच्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी सुध्दा वाढायला हवी अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ३०० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रातून २ […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात उत्साहाच्या वातावरणात मतदान सुरु आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन आणि उमेदवार प्रयत्न करीत आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, निवासी नायब तहसीलदार अनिल मालुंजकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ आदी अधिकारी मतदान केंद्राना भेटी देत आहेत. मतदारांना आणि कर्मचाऱ्यांना अडचणी आल्यास तातडीने व्यवस्थापन केले जात […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार धनाजी अशोक टोपले यांनी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. आक्रमक पद्धतीने आदिवासी आणि सामान्य लोकांच्या विकासासाठी लकीभाऊ जाधव आणि धनाजी टोपले ह्या युवा नेतृत्वाची एकजूट झाली आहे. लकीभाऊ जाधव हे खरोखर अत्यंत गरीब घरातील असून […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी अनुसूचित जमातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात एकूण ३०० मतदान केंद्र असून पुरुष १ लाख ४३ हजार ६१, स्त्रिया १ लाख ३७ हजार ४९३ आणि इतर ५ असे एकूण २ लाख ८० हजार ५५९ मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त आणि संवेदनशील केंद्रावर कमांडंट तैनात असतील. १५० मतदान केंद्रावर वेब कास्टिंग असून […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – प्रचंड चुरस, अस्तित्वाची लढाई आणि आरोपांच्या फैरी यामुळे गाजत असलेल्या इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. आता गुप्त बैठका, राजकीय डावपेच, भेटीगाठी रंगणार आहे. महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, महायुतीचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, अपक्ष निर्मला गावित, अपक्ष बाळासाहेब झोले, जनवादी पक्षाचे अनिल गभाले, वंचितचे भाऊराव […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी मतदारसंघातून माझे चिरंजीव बाळासाहेब झोले अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे. मुलचंदभाई गोठी, स्व. गोपाळराव गुळवे, ॲड. छबाजी खातळे यांची परंपरा असलेला हा मतदारसंघ आहे. जेंव्हा पासून हा आदिवासी मतदार संघ राखीव झाला तेंव्हापासून या नेतेमंडळींनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देऊन त्यांना आमदार केले. आता नागरिकांची मागणी आहे की […]
इगतपुरीनामा न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असून त्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडुन नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सार्वत्रिक निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हयात सद्यस्थितीत ४८ सराईत गुन्हेगार हद्दपार आहेत. एमपीडीए कायद्यान्वये २ सराईत गुन्हेगार स्थानबध्द आहेत. १४ देशी बनावटीचे पिस्टल, ३७ जिवंत […]