शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खातळे यांचा मतदारांवर वाढता प्रभाव : प्रभाग ४ मध्ये बदलाचे जोरदार वारे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेना धनुष्यबाण पक्षाचे उमेदवार समाजसेवक अर्जुन खंडू खातळे यांचा मतदारांवर प्रभाव वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात त्यांना नगरसेवक म्हणून इगतपुरी नगरपरिषदेत पाठवण्याबाबत लोकांचे एकमत झाल्याचे दिसते. शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, रिपब्लिकन सेना महायुतीची उमेदवारी ते करत आहेत. शिवसेना धनुष्यबाण पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शालिनी संजय खातळे यांनाही त्यांच्यासोबत निवडून देण्याचा मतदारांनी निर्णय घेतलेला दिसतो. संपूर्ण इगतपुरी शहरात शिवसेनेच्या धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे असलेले उमेदवार बहुमताने निवडून येतील असा कयास आहे. समाजसेवक अर्जुन खातळे यांना जनसेवेचा दीर्घाकाळापासून अनुभव आहे. त्यामुले प्रभागात त्यांचे कार्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची कार्यपद्धती प्रभावी ठरेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. प्रभागातील प्रमुख प्रश्नांची उत्तम जाण आणि ते सोडवण्याचे कौशल्य अर्जुन खातळे यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रभाग ४ मध्ये त्यांना नगरसेवक म्हणून निवडून देण्यावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केले आहे.

error: Content is protected !!