
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आज झालेल्या दणदणीत सभेमुळे इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत एकतर्फी वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदावर शिवसेना धनुष्यबाण पक्षाच्या सौ. शालिनीताई संजय खातळे, प्रभाग ४ चे लोकप्रिय उमेदवार अर्जुन खंडू खातळे यांच्यासह सर्व उमेदवार अभूतपूर्व मतांनी विजयाचे शिखर गाठणार आहेत. इगतपुरीच्या नागरिकांनी परिवर्तन करून काम करणाऱ्या माणसांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सभेवेळी उपस्थित मोठी संख्या पाहता परिवर्तन होणे अटळ आहे असा खंबीर विश्वास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे यांनी व्यक्त केला आहे. श्री. खातळे यांनी सांगितले की, आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या, अनुभवल्या. पण धर्म, जात, पैसा आणि खोटी आश्वासने याचा आधार घेऊन संबंधित व्यक्तींनी इगतपुरीकर नागरिकांना वेड्यात काढले. काळ खूप पुढे गेलाय, आता लहान बाळ सुद्धा वेडं राहिलेलं नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नगराध्यक्ष पदावर शिवसेना धनुष्यबाण पक्षाच्या उमेदवार सौ. शालिनीताई संजय खातळे, प्रभाग ४मधून अर्जुन खंडू खातळे आणि अन्य सर्वांचा विजय पक्का आहे. येत्या २ तारखेला इगतपुरीकर नागरिक परिवर्तन करून प्रस्थापित नेत्यांना आरामाला पाठवतील यात काहीही शंका नाही. ना. एकनाथ शिंदे यांच्या सभेने तर विक्रमी मताधिक्य मिळेल असेही भाऊसाहेब खातळे यांनी व्यक्त केले.