इगतपुरी धुवून खाणाऱ्या भ्रष्ट्राचाऱ्यांना घरी बसवायला जनतेनेच निवडणूक घेतली हातात – फिरोजभाई पठाण 

इगतपुरीनामा न्यूज – या निवडणुकीत इगतपुरीच्या जनतेचा कौल स्पष्टपणे बदलाच्या दिशेने जात असल्याची चिन्हे दिसत आहेत. “ही निवडणूक आता जनतेनेच स्वतःच्या हातात घेतली आहे. अनेक वर्षांपासून इगतपुरीला धुवून खाणाऱ्या भ्रष्ट्राचाऱ्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाग क्र. ६ चे लोकप्रिय उमेदवार फिरोजभाई पठाण यांनी सभेनंतर सांगितले. इगतपुरीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी नगरपरिषदेतील कामकाजावर जोरदार टीका केली. विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई, निधींचा अपुरा वापर, रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा बोजवारा आणि नागरिकांच्या समस्या न सुटल्याबद्दल त्यांनी विद्यमान व्यवस्थापनाला जबाबदार धरले. इगतपुरीची जनता सुजाण आहे. बदल हवा असेल तर लोकशाहीत मतदारच निर्णय देतो. यावेळी नागरिक भ्रष्ट्राचारमुक्त, कार्यक्षम प्रशासनाची निवड करतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बैठकीला उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनीही प्रभागनिहाय प्रश्न मांडत स्वच्छ आणि पारदर्शक नगरपरिषद स्थापनेची मागणी केली. निवडणुकीत वाढत असलेली जनतेची भागीदारी पाहता येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!