फिरोज पठाण, मयुरी पुरोहित, आशा थोरात यांची प्रभाग ६ मधून विजयाकडे घोडदौड : राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाची घरोघरी चलती 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चशिक्षित आणि शिक्षक असलेल्या मयुरी राहुल पुरोहित या तरुण उमेदवाराला नगरसेविका होण्याची संधी लाभली आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी त्यांना प्रभाग क्र. ६ मध्ये त्यांच्या सोबत उमेदवारी करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. मयुरी पुरोहित पेशाने शिक्षिका असून त्यांचे शिक्षण एमएस्सी बीएड असे झाले आहे. प्रभागातील समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. स्वतः जबाबदार महिला असल्याने त्यांना महिलांच्या समस्यांची पुरेपूर जाण आहे. त्यांच्यावर गृहिणी, शिक्षिका, आई या सर्व जबाबदाऱ्या आहेत, आता नागरिकांकडून त्यांना नगरसेविका म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. सुखदुःखात सदैव पाठीशी उभे राहून मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांचा इगतपुरीत अफाट जनसंपर्क आहे. म्हणूनच प्रभाग ६ मध्ये मयुरी राहुल पुरोहित यांना लोकांचा आशीर्वादरुपी पाठिंबा मिळत आहे. प्रभाग क्र. ६ मध्ये फिरोज पठाण, मयुरी पुरोहित, आशा थोरात हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह घेऊन निवडणुक लढवत आहेत. तिघेही उमेदवार विजयाचे दावेदार असून प्रचारातही जबरदस्त आघाडीवर आहेत. त्यामुळे हे तिन्ही जण निवडून येतील असा आत्मविश्वास प्रभागातील नागरिकांना वाटत आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणी घेऊन नगराध्यक्ष पदासाठी सौ. शालिनीताई संजय खातळे यांना ह्या प्रभागातून चांगले मताधिक्य मिळणार आहे.

error: Content is protected !!