
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी प्रभाग क्र. ६ मधून राष्ट्रवादीचे प्रदेश नेते फिरोज पठाण हे नगरसेवक पदासाठी घड्याळ चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. त्यांच्याबाबत प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, विकासाची दूरदृष्टी, सर्व जातीधर्माशी स्नेह आणि आदर्श जनसेवेच्या भावनेमुळे इगतपुरीत ते एक आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. फिरोज पठाण यांनी नेहमीच समाजातील दुर्बळ घटकांसाठी सुद्धा काम केले आहे. त्यांची विकासाची कार्यपद्धती पाहता, ते निवडून आल्यास त्यांच्याकडून इगतपुरीच्या विकासाला नक्कीच नवी दिशा मिळेल असा नागरिकांचा विश्वास आहे. यामुळे प्रभाग ६ मध्ये फिरोज पठाण यांचे पारडे जड झाले आहे. त्यांना प्रभागातील नागरिकांसह संपूर्ण शहरात सर्वोत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे फिरोज पठाण यांची घोडदौड विजयाकडे गतिमान वेगाने सुरु आहे. त्यांच्यासोबत सौ. मयुरी राहुल पुरोहित या उच्चशिक्षित उमेदवार उभ्या आहेत. त्या अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे काम करत आहे. सौ. आशा सुनील थोरात ह्या उमेदवाराने बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना सक्षम केले आहे. त्या समाजकार्यात नेहमीच पुढे असतात. तिन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा नागरिकांना आत्मविश्वास आहे.
एका नागरिकाने सांगितले की, फिरोज पठाण हे प्रभाग ६ मधील सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार आहे. त्यांच्या माध्यमातून सुंदर विकसित इगतपुरी साकार होऊ शकते. प्रभाग ६ मधून फिरोज पठाण यांचा विजय कोणीही रोखू शकणार नाही. फिरोज पठाण हे समाजातील सर्व स्तरातील लोकांशी जोडलेले आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रचारावेळी नागरिक मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येत आहेत. फिरोज पठाण हे केवळ नगरसेवक म्हणून निवडून येणार नाहीत, तर ते एका चांगल्या आणि विकासाभिमुख नेतृत्वाची सुरुवात करतील, असे मत व्यक्त केले जात आहे. फिरोज पठाण यांचे घड्याळ चिन्ह घरोघरी पोहोचले असून नागरिकांनी त्यांना नगरपरिषदेत पाठवण्यासाठी निर्धार केला आहे.