प्रभाग क्र. ५ मध्ये राष्ट्रवादीच्या निकत सय्यद, शिवसेनेचे उमेश कस्तुरे यांच्याच विजयाची चर्चा : फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली दोघांचा विजय निश्चित 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीत प्रभाग क्र. ५ मध्ये निकत वसीम सय्यद ह्या राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढत आहेत. शिवसेना धनुष्यबाणची उमेदवारी उमेश कस्तुरे करत आहेत. दोघांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरून संपूर्ण प्रभागात मोठी आघाडी घेतली आहे. निकत सय्यद ह्या राष्ट्रवादी घड्याळचे शहराध्यक्ष वसीम सय्यद यांच्या सौभाग्यवती आहेत. आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली विविध लोकोपयोगी विकासाची कामे केली आहेत. यामध्ये इगतपुरी शहरात रस्ते, शादी खाना, कब्रस्थान, ईदगाह, उद्यान, सुगत बुद्धविहार येथील कामे, पटेल चौक येथील मंदिराचे काम, कॉन्व्हेंट शाळेकडे जाणारा व चर्चला जोडणारा रस्ता आदी विकासकामे आहेत. जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वसीम सय्यद हे नाव जनतेच्या मनात रुजलेले आहे. त्यांना याचा मोठा फायदा या निवडणुकीत होणार आहे. त्यांच्याच सोबत असलेले उमेदवार उमेश कस्तुरे हे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांचे त्यांना नेहमी मार्गदर्शन व कामासाठी पाठिंबा असतो. त्यांनीही अनेक समस्या सोडवल्या आहेत. फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली या दोघांचा या प्रभागात विजय निश्चित समजला जात आहे. शिवसेना धनुष्यबाण निशाणीवर नगराध्यक्ष पदासाठी सौ. शालिनीताई संजय खातळे यांना ह्या प्रभागातून मतांची मोठी आघाडी मिळणार आहे.

error: Content is protected !!