विरोधकांची कितीही आली वादळे.. निवडून येतील शालिनीताई खातळे…! – उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची इगतपुरीत गर्जना : शिवसेना, राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – विरोधकांची कितीही आली वादळे तरी नगराध्यक्षपदी निवडून येतील शालिनीताई खातळे…! विकासाच्या पत्रावर ताबडतोब सह्या करणारा उपमुख्यमंत्री म्हणून माझे नाव सर्वांना माहित आहे. इगतपुरीच्या विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. नगरविकास विभाग माझ्याकडे आहे. इगतपुरीला विकसित करण्यासाठी उपस्थित मंत्री आणि आमदार इगतपुरीकरांच्या सोबत आहेत. काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्यांच्या हातात इगतपुरी दिली त्यांनी इगतपुरीचे वाटोळे केले. इगतपुरी ही महाबळेश्वरच्या धर्तीवर थंड हवेचे ठिकाण व्हावे. ह्या शहराचा विकास अजिबात थांबणार नाही. स्वच्छ इगतपुरी, सुंदर इगतपुरी आणि विकसित इगतपुरी हा आमचा नारा आहे. रोज पाणी, चांगले रस्ते आणि सर्व सुविधा पाहिजे असेल तर सर्व उमेदवारांना निवडून द्या. शब्द देतोय, माघार घेणार नाही. इगतपुरी शहराला विकसित करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी इगतपुरी येथे केले. इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आणि रिपब्लिकन सेना महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. चांगले उद्योग आणून इगतपुरीच्या रोजगाराचा प्रश्न निकाली काढू असे सांगत त्यांनी कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येने भावाची वाट पाहणाऱ्या उपस्थित लाडक्या बहिणींचे कौतुक केले. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे असे ते शेवटी म्हणाले. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी प्रास्ताविकात इगतपुरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राहील असे सांगितले. रिपब्लिकन सेनेचे अनंतराज आंबेडकर यांनी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाल्याचे सांगितले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शालिनी संजय खातळे, फिरोज पठाण, अर्जुन खातळे, उमेश कस्तुरे, निकत वसीम सय्यद, मयुरी राहुल पुरोहित, आशा थोरात, राज जावरे, राज्याचे मंत्री ना. दादासाहेब भुसे, नरहरी झिरवाळ,राष्ट्रवादी नेते नजीम मुल्ला,इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, माजी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, ॲड. संदीप गुळवे, ज्ञानेश्वर लहाने, संजय खातळे, पांडुरंग वारुंगसे, देविदास जाधव, विनायक पाटील आदीसह हजारो नागरिक, महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

error: Content is protected !!