
इगतपुरीनामा न्यूज – माझ्या प्रभाग ६ मधील मायबाप मतदारांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी भक्कमपणे आहेत. या मायबाप जनतेने आतापर्यंत खोटी आश्वासने देणाऱ्यांचे खूप सहन केले. आता जागरूकता वाढली आहे. ह्या प्रभागात विकासाची मुबलक कामे व्हावीत, प्रभाग सुजलाम सुफलाम व्हावा, सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, तीस वर्षात मागे पडलेला विकास व्हावा यासाठी जनतेने माझ्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, शिवसेना धनुष्यबाण आणि रिपब्लिकन सेना महायुतीचा उमेदवार म्हणून मी संपूर्ण ताकदीने प्रभाग ६ मधून निवडून येणार आहे. यासह माझ्यासोबत असलेल्या मयुरी पुरोहित, आशा थोरात ह्या दोघी रणरागिणी सुद्धा निवडून येणार आहेत. मायबाप जनतेने खोट्या आश्वासनांचा बाजार उठवून भ्रष्ट्राचाऱ्यांचा राक्षस गाडण्याची प्रतिज्ञा केली आहे अशी माहिती इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीचे प्रभाग ६ मधील लोकप्रिय उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी दिली. इगतपुरी नगरपरिषदेत शिवसेना धनुष्यबाण पक्षाकडून सौ. शालिनी संजय खातळे ह्या नगराध्यक्षा म्हणून निवडून येणार आहेत. यासह राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, शिवसेना धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह घेऊन उमेदवारी करणारे सर्व उमेदवार मोठ्या मतांनी जिंकणार असल्याचेही ते म्हणाले. नागरिकांनी तीस वर्षात ६ वेळा मतदान करून इगतपुरीला भकास करणाऱ्या लोकांना निवडून दिले. घाणेरडे राजकारण करून इगतपुरीकरांना कायम वेठीस धरले. ५० वर्ष इगतपुरीला मागे नेवून दारिद्र्य वाढवण्याचे काम केले. आता जनता मुकी, बहिरी आणि आंधळी राहिलेली नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, शिवसेना धनुष्यबाण पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी जनता पुढे आली आहे. आम्ही सर्वच उमेदवार प्रामाणिकपणे काम करून इगतपुरीला विकसित करण्याचा ध्यास घेतलेले दिले आहेत. इगतपुरीला ओरबाडून लुटून खाणाऱ्यांना कायमचे घरी बसवणारी ही निवडणूक आहे असे फिरोज पठाण शेवटी म्हणाले.