लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा पवित्र ते कुळ पावन तो देशजेथे हरिचे दास जन्म घेतीअसे सर्वच संतांचे सिद्ध झालेले प्रमाण आहे. ह्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका सुद्धा मागे नाही. ह्या तालुक्यात विविध रत्नांची खाण आहे. ह्यापैकी अत्यंत महत्वाचे अनमोल असणारे एक रत्न हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे १ एप्रिल २०२३ ला वैकुंठवासी झाले. […]
लेखन : भास्कर सोनवणे, संपादक महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित ठेवण्याचे काम आधुनिक काळातील संतस्वरूप महात्मे करीत असतात. पांडुरंग परमात्म्याची सेवा करतांना तोच विठोबा प्रत्येक जीवामध्ये शोधण्याचे कसब सुद्धा ह्याच साधकांकडून होते. वाया जाऊ देऊ नये एक क्षण.. भक्तीचे लक्षण जाणावे हे याप्रमाणे जीवनातील प्रत्येक मिनिट हरिभक्ती करणारे विरळेच.. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ : इगतपुरी नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या साबेरा पवार यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. भाजपाचे इगतपुरी तालुका उपाध्यक्ष मुन्ना पवार यांच्या त्या मातोश्री होत्या. इगतपुरी नगरपरिषद निवडणूक २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ५ ब मधून भाजपाच्या तिकीटावर त्या निवडून आल्या होत्या. पाच वर्षाच्या काळात इगतपुरी शहरातील विविध विकासाच्या कामात त्यांचे मोलाचे योगदान होते. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव भागातील एक अविवाहित गरोदर मुलगी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहे. त्या मुलीने गरोदर असल्याचा खुलासा केला. म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील बळजबरी करून गरोदर करणाऱ्या युवकाचे नाव घेतले. याबाबत खात्री करण्यासाठी घोटी पोलिसांनी पोलीस पाटलाच्या मार्फत संबंधित तरुणाला संपर्क साधला. यामुळे घाबरलेल्या ह्या तरुणाने आपले जीवन संपवून […]
लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा लाखो दीनदुबळ्या लोकांची सेवा, गावोगावी विकासाचे पर्व, शिक्षणाची ज्ञानधारा, हजारो कार्यकर्त्यांची घडवणूक आणि अनेक कुटुंबांना हक्काची भाकरी मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असे लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे सर्वांच्या मनामनात आहेत. हे सगळं विकासाचे विश्व उभे करणाऱ्या स्व. दादासाहेबांच्या नंतर त्यांचे सुपुत्र ऍड. […]
लेखन : भास्कर सोनवणे, संपादक जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी जगला पाहिजे. सर्व उद्योगाचा पाया फक्त शेतीच आहे. शेती, शेतकरी आणि देश ही त्रिसूत्री जगासाठी उपयुक्त आहे असा दृढ विश्वास सहप्रयोग सिद्ध करून हा सार्थ विश्वास अनेक शेतकऱ्यांत निर्माण करणारे स्व. कारभारी गिते देवाचीच देणगी होती. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला जाणे शक्य नसते. अशा ठिकाणी स्व. कारभारी […]
लेखन : ॲड. गौतम रुंजा नाठे, पै. संदीप भास्कर गायकर आणि मित्रपरिवार गोंदे दुमाला परिसर म्हणजे कामगार, वंचित, शोषित आणि गरिबांच्या कष्टासाठी अखंडित सुरु असलेली मायभूमी. कोणावर अन्याय, अत्याचार होत असेल तर त्यावर परिणामकारक मार्ग शोधून त्यावर प्रभावी काम करणारा शोषितांचा बुलंद आवाज म्हणून स्व. हिरामण भिवा नाठे हे ओळखले जात. सर्वांशी घट्ट स्नेहसंबंध, सडेतोड […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 1 जण नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यूमुखी पडला. सक्रू शंकर मेंगाळ वय 47 असे त्यांचे नाव असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याची चर्चा गावात सुरु आहे. अनेक नागरिकांना […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 ‘आदिवासी, ग्रामीण भागाचा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून देशभर लौकीक असलेले प्रगल्भ असे मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘ज्येष्ठ नेते गावित यांची ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री ही वाटचाल त्यांच्या नेतृत्वाविषयी खूप […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी रुग्णालयाचे तत्कालीन अधिकारी देवतुल्य व्यक्तिमत्व स्व. डॉ. प्रदीप केशवराव नाईक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त इगतपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते शाम चव्हाण, धिरज परदेशी तुषार शिंदे यांनी प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. डॉक्टरांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित त्यांच्या पत्नी पद्मजा नाईक व त्यांच्या दोन मुलांनी समाधान वृद्धाश्रम इचलकरंजी येथे मोफत वैद्यकीय आरोग्य […]