
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या आदिवासी भागातील समस्यांना परिणामकारक वाचा फोडून ते सोडवणारे हाडाचे पत्रकार राजीव रमाकांत गुप्ते ( सर ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. दैनिक सकाळच्या माध्यमातून टाकेद बुद्रुक येथून त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केलेली आहे. टाकेद बुद्रुक येथील न्यू इंग्लीश स्कूलचे ते निवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यशासाठी मौलिक मार्गदर्शन केलेले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते. इगतपुरी तालुक्यातील पत्रकारांसह तालुक्यातून शोक व्यक्त केला आहे.