विठोबा दिवटे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ २० वर्ष घोटीच्या बाजार समितीत भाजीपाला मार्केटमध्ये हमाली करणाऱ्या तुकाराम भागूजी कोकणे रा. आडवण ह्या दुर्दैवी बापावर आज आभाळ कोसळले. त्यांचा एकुलता एक मुलगा नामदेव याचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तुकाराम कोकणे यांनी हमाली करून प्रपंचाचा गाडा हाकला. अन मग मुलगा हाताखाली आल्यावर शरीर थकल्याने हमाली […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ मुकणे येथील सोन्याबाई नामदेव आवारी ( वय ९५ ) यांचे रविवारी आषाढी एकादशीला निधन झाले. घोटी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी सुभाष भिमा आवारी, मुकणे ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पंढरी आवारी व मुंबई राखीव पोलीस दलातील संदीप भास्कर आवारी यांच्या त्या आजी होत. मुकणे गावासह पंचक्रोशीत सुपरिचित असलेल्या शेतकरी कुटुंबातील भिमा […]
शब्दांकन : लक्ष्मण सोनवणे, पत्रकार सुखी संसाराचा गाडा हाकताना अचानक पतीच्या निधनाने खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या महिला आपल्याला पाहिला मिळतात. पतीचा आधार नसूनही अनेक महिलांचा आपल्या मुलांना घडविण्यात मोलाचा वाटा असतो. मेहनत आणि अपार कष्ट करून अशिक्षित असूनही आपल्या मुला मुलींना यशाचे पंख जोडणाऱ्या घोटी येथील आदिवासी समाजाच्या रणरागिणी कै. झुणकाबाई तुकाराम नारळे वय 96 यांचे वृद्धापकाळाने […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० केपानगर ता. सिन्नर येथील केशव पुंजा व्यवहारे वय ५५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुका नाभिक समाज सलून असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप व्यवहारे व राहुल व्यवहारे यांचे ते वडील होत.
लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा सेवाकार्य आणि मानवता ह्या दोन्ही गुणांची अलौकिक देणगी लाभलेले मोडाळे येथील स्व. डॉ. त्र्यंबक काळूजी शेंडगे हे इगतपुरी तालुक्यातील आदिवासी जनतेच्या हृदयात आहेत. गेली ३० वर्ष धीरोदत्तपणे मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव भागातील लोकांच्या सेवेला वाहून घेण्याचे कार्य त्यांनी अखेरपर्यंत केले. अहोरात्र वैद्यकीय सेवा देतांना लोकांना आधार देऊन उभे […]
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे डॉ. त्र्यंबक काळूजी शेंडगे हे व्यक्तिमत्व म्हणजे जनसेवेचे सेवाव्रती व्यक्तिमत्व. ग्रामीण भागातील कसाही थंडी तापाचा रुग्ण असो दादांकडे तो आल्यावर लगेच बरा व्हायचा. त्यांच्याकडे कोणताही रुग्ण आला की ठणठणीत झाल्याशिवाय राहत नव्हता. दादांमुळे आम्हालाही कधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासली नाही. मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव या ठिकाणी वैद्यकीय सेवा देताना कुठलाही आर्थिक […]
लेखन – हभप जालिंदर महाराज रेरे, कीर्तनकार, खैरगावदेविदास भगवंता हिंदोळे, प्राथ. शिक्षक पिंपळगाव भटाटा ज्या मातीमध्ये जन्म घेऊन जगणे शिकलो ती पावन माती, जन्म देणारी माता आणि आपला समाज ह्या त्रिसूत्रीला विसरू नये. कृतज्ञतेची कास धरून जनतेच्या हृदयातील परम परमात्मा पांडुरंग परमेश्वर प्रसन्न होईल असे नित्य कार्य करीत राहावे. अशा प्रकारची शेकडो नीतिमूल्ये ज्यांच्या धमन्यांमध्ये […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ चार वर्षांपूर्वी झालेल्या राज्यपातळीवरील झालेल्या महत्वपूर्ण निवडणुकीत इगतपुरी तालुक्याचे भूषण स्व. इंदुमती गोपाळराव गुळवे ह्या ९६ मतांनी निवडून आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर एन. व्ही. आघाव यांनी आज निकाल घोषित केला. इगतपुरी तालुक्याचे मानबिंदू स्व. लोकनेते […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ गोंदे दुमाला येथील कै. शकुंतलाबाई खंडू सोनवणे वय – 65 वर्षे यांचे आज निधन झाले. गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे यांचा त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. शकुंतलाबाई खंडू सोनवणे यांनी आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सुसंस्कार दिले. शून्यातून मोठी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने उद्या सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित […]