
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ : इगतपुरी नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या साबेरा पवार यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. भाजपाचे इगतपुरी तालुका उपाध्यक्ष मुन्ना पवार यांच्या त्या मातोश्री होत्या. इगतपुरी नगरपरिषद निवडणूक २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ५ ब मधून भाजपाच्या तिकीटावर त्या निवडून आल्या होत्या. पाच वर्षाच्या काळात इगतपुरी शहरातील विविध विकासाच्या कामात त्यांचे मोलाचे योगदान होते. साबेरा पवार यांच्क अंत्यविधी कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वाजता स्वामी समर्थ नगर, गोळीबार मैदान येथून सुरु होणार आहे. त्यांच्या निधनाबद्धल भाजपा इगतपुरी तालुका, शहर आणि तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी शोक व्यक्त केला आहे.