लेखन : ॲड. गौतम रुंजा नाठे, पै. संदीप भास्कर गायकर आणि मित्रपरिवार
गोंदे दुमाला परिसर म्हणजे कामगार, वंचित, शोषित आणि गरिबांच्या कष्टासाठी अखंडित सुरु असलेली मायभूमी. कोणावर अन्याय, अत्याचार होत असेल तर त्यावर परिणामकारक मार्ग शोधून त्यावर प्रभावी काम करणारा शोषितांचा बुलंद आवाज म्हणून स्व. हिरामण भिवा नाठे हे ओळखले जात. सर्वांशी घट्ट स्नेहसंबंध, सडेतोड भाषा, काम करण्याची उत्तम हातोटी आणि सामाजिक कामाची आवड ही स्व. हिरामण नाठे यांची वेगळी वैशिष्ट्य म्हणावी लागतील. कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पूर्ण करून दोस्तीसाठी काहीही करणारा हा राजामाणूस परमेश्वराने आमच्यातून हिरावून घेतला. या घटनेमुळे गोंदे दुमाला परिसर आणि इगतपुरी तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
कै. हिरामण भिवा नाठे हा अतिशय धडाडीचा कार्यकर्ता म्हणून परिचित होता. शिवसंग्राम पक्षाचे जिल्हा उपाध्यक्षपद भूषवत असताना सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल कमिटी अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले. विविध पदांवर सामाजिक काम करत असताना इगतपुरी तालुक्यामध्ये तरुणवर्गामध्ये त्यांचा दांडगा संपर्क होता. त्याच्या आकस्मिक जाण्याने एक मनमिळावू, होतकरु, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा गरिबांचा सामाजिक कार्यकर्ता हरपला. त्यांचा दशक्रिया विधी गोदे दुमाला येथे रविवारी ३० ऑक्टोबरला होणार आहे. त्यांच्या पश्चात गं.भा. नाजुका हिरामण नाठे (पत्नी), श्री. भिवाजी पुंजा पा. नाठे ( वडिल ), सौ. भागुबाई भिवाजी नाठे (आई ), श्री. वसंत भिवाजी पा. नाठे (भाऊ), श्री. गोपाळ लक्ष्मण नाठे ( ग्रा. पं. सदस्य), सौ. जिजाबाई पुंजीराम जाधव (बहीण), सौ. शारदा गणेश काजळे (बहीण), सौ. भारती बाळासाहेब आपसुंदे (बहिण) असा मोठा परिवार आहे. जिवलग मित्र स्व. हिरामण भिवा नाठे यांना गोंदे दुमाला परिसर कधीही विसरू शकतं नाही. भावपूर्ण श्रद्धांजली..!