

इगतपुरीनामा न्यूज – मारहाण केल्याप्रकरणी युवा नेते मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे इतर १० सहकारी यांच्यावर २०१२ मध्ये हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर नाशिकचे जिल्हा न्यायाधीश कोल्हापुरे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. त्यानुसार आज तब्बल १२ वर्षांनी अकरा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बारा वर्षापुर्वी गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक वर्षांपासून हा खटला न्यायालयात सुरु होता. या गुन्ह्यात जिल्हा न्यायाधीशांसमोर खटल्यातील तक्रारदाराची साक्ष व पंचाचे साक्षी पुरावे तपासून झाल्यानंतर या गुन्हातुन युवा नेते मिथुन राऊत यांच्यासह १० जणांची आज गुरुवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावेळी ॲड. संदिप पवार यांनी न्यायालयात योग्य युक्तिवाद करून बाजू मांडली होती.