त्र्यंबक तालुक्यातील विविध दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश : त्र्यंबक तालुक्यातील राजकारणाला मिळणार कलाटणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ह्या पक्षांतरामुळे गणिते बदलली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी सांगितले. पक्षांतर कार्यक्रमावेळी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ उपस्थित होते.

आज त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेते रवींद्र भोये, युवा नेते मिथुन राऊत, राष्ट्रवादीचे त्र्यंबकेश्वर तालुका सरचिटणीस अरुण काशीद, राष्ट्रवादीचे तालुका संघटक अंबादास बेंडकोळी, सरपंच प्रवीण तुंगार, उपसरपंच सुभाष मेघे, तोरगंणचे माजी सरपंच रामदास बोरसे, जातेगावचे उपसरपंच ललीत तरवारे, जातेगावचे माजी सरपंच रमेश तरवारे, भरत खोटरे, विलास जाधव, रामदास घटके, संदीप भोये, पप्पु मेढे आदींनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा असे सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!