त्र्यंबकेश्वरचा तलाठी २ हजाराची लाच घेतांना ताब्यात : नाशिक लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर येथील ३८ वर्षीय तक्रारदार यांनी जमीन खरेदी केली आहे. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात तलाठी संतोष शशिकांत जोशी वय ४७, कोतवाल रतन सोनाजी भालेराव वय ५१ सजा त्र्यंबकेश्वर जि. नाशिक यांनी २ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तलाठी संतोष शशिकांत जोशी ह्याला लचेही रक्कम तलाठी कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे पंच साक्षीदारास समक्ष स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले  आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांनी सापळा अधिकारी म्हणून यशस्वी काम केले. सापळा पथकातील पो. ना. प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके, चालक पोहवा संतोष गांगुर्डे यांनी ही कामगिरी केली. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे किंवा दुरध्वनी क्रमांक ०२५३२५७८२३० किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!