शिरसाठे येथील जमिनीचा निकाल लावून दिल्याच्या मोबदल्यात १ लाख ५० हजाराची लाच भोवली : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाचा चालक एसीबीच्या जाळ्यात

सौजन्य : गुगल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथे गट क्रमांक १७६ ह्या जमीनीबाबत तत्कालीन प्रांतधिकारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यांचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून दिला. त्र्यंबकेश्वर तहसीलचा वाहनचालक अनिल बाबुराव आगीवले याने त्याच्या मोबदल्यात २ लाखांची लाच मागितली होती. त्याला याआधी ५० हजार दिले होते. उर्वरित दीड लाख घेताना अनिल बाबुराव आगीवले याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Similar Posts

error: Content is protected !!