
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – देशातील सर्व धर्मांतरित आदिवासींच्या शासकीय योजना व सवलती बंद कराव्या असा ठराव चिंचवड खोरीपाडा येथील धर्मसभेत एकमताने मांडण्यात आला. हभप काशिनाथ महाराज भोये ओझरखेड धाम यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतनानिमित्त 1008 महांडलेश्वर रघुनाथ देवबाप्पा फरशीवाले बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड खोरीपाडा येथे धर्म संसद व शाही मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून साधू महंत धर्म संसदेत सामील झाले होते.
हभप काशिनाथ महाराज आदिवासी भागातील पहिले सर्व कुंभ करणारे महंत आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आदिवासी लोकांमध्ये जनजागृती करून आदिवासी मधील धर्मांतर रोखण्यात त्यांनी यश मिळवले असे गौरवोदगार धर्म संसदेचे अध्यक्ष महमंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर महाराज यांनी यावेळी काढले. महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती महाराज कैलास मठ नाशिक, महंत महामंडलेश्वर रामस्नेही गुरुनारायणदास श्री लक्ष्मी नारायण मंदिर ( बडा ) तपोवन यांच्यासह उपस्थित साधू मंहत यांनी हभप काशिनाथ महाराज यांचे कौतुक केले.
महंत महामंडलेश्वर राम किशोर दासजी शास्त्री महाराज दिगंबर अनी आखाडा, महामंडलेश्वर भक्तीदास महाराज पंचमुखी हनुमान मंदिर, पंचवटी, महामंडलेश्वर फलाहारी महाराज कपिलधारा तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र कावनई, सच्चिदानंद महाराज, देवबाप्पा आश्रम मंडला, मध्यप्रदेश, प्रेमदासजी महाराज फरशीवाले बाबा सेवा आश्रम, वैराग्यमूर्ती गुरुवर्य हभप कुरेकर बाबा आळंदीदेवाची, महामंडलेश्वर ईश्वरदासजी चऱ्हाटे आळंदी, महामंडलेश्वर डॉ. शरामकृष्णदासजी लहवितकर महाराज, अमृताश्रम स्वामी महाराज अमृतदासजी रमणगिरीजी महाराज ( जेएनयू भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासक ) महंत दिव्यानंद महाराज अन्नपूर्णा आश्रम त्र्यंबकेश्वर, खडेश्वरजी महाराज ( येवला ) आदी सह नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कुंभमेळ्यातील शाही स्नानावेळी आखाडा प्रमुखांच्या शाही मिरवणुकी सारखी मिरवणूक आदिवासी भागात चिंचवड ग्रामस्थ व भक्तांनी साधुमंतांचे काढली होती. ती पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी जोग वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान महाराज हसेगावकर यांच्या कीर्तनाने अभिष्टचिंतन सोहळा व धर्मसंसदेची सांगता झाली. अभिष्टचिंतन सोहळा व धर्म संसदेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी माऊली धाम सेवा आश्रमाचे विश्वस्त संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हरिओम सेवा मंडळ, माऊली धाम परिवार चिंचवड -खोरीपाडा ग्रामस्थ व हरसुल परिसरातील भक्त परिश्रम घेतले.
