इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही गावांतील संपूर्ण पॅनल निवडून आले आहे. विशेष म्हणजे मोडाळे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या शिल्पा आहेर आणि ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरवात होणार आहे. त्यानंतर पहिला निकाल सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अपेक्षित असून साधारणपणे दुपारी १२ च्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन तहसीलदार प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशी माहिती इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी दिली आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत परिणामकारक ठरणाऱ्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान तर निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन तर पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी कायम केला आहे. अनर्ह झालेल्या सरपंच ताई बिन्नोर यांचे अपील फेटाळण्यात येऊन मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम करण्यात आला आहे याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी तालुक्यातील कोरपगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल बाळू कडलग यांची निवड झाली आहे. उपसरपंच निवडीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सुनीता नारायण पवार, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम वायाळ, गजीराम झुगरे, स्वाती डहाळे आदी उपस्थित होते. अनिल कडलग यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा होताच ग्रामस्थांनी फटाके व गुलालाची उधळण करून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयराम गेणू गव्हाणे यांना नाशिक जवळ पांडवलेणी भागात मारहाण झाली आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला कुऱ्हेगावच्या दिशेने जात असताना अचानक आलेल्या तिघांनी मारहाण केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मारहाणीनंतर संशयित व्यक्ती पळून गेले. या घटनेत फिर्यादी जयराम गव्हाणे हे जखमी झाले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी तालुक्यातील दौंडत ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विठ्ठल देवराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच विठाबाई पांडुरंग रजेवर असल्याने विद्यमान उपसरपंच विठ्ठल शिंदे यांना प्रभारी सरपंच पदाची सूत्रे देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे परिसरातून स्वागत होत आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे यांनी निवडणुक विवाद अर्ज दाखल केला होता. त्याबाबत वेळोवेळी सुनावणी कामकाज घेऊन पुरावे अवलोकन करण्यात आले. त्यानुसार सरपंच ताई बिन्नर यांचे पती आणि सासरे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल आज लागले आहेत. यामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वराज्य संघटनेला अपेक्षित यश मिळाले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ८९ ग्रामपंचायत सदस्य व १३ थेट सरपंच म्हणून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते निवडुन आले आहेत. यामध्ये कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, बीड, लातूर, अहमदनगर, परभणी, रायगड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. महानगरपालिका, नगरपालिका, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – इगतपुरी तालुक्यातील २ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. हेलिकॉप्टरमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर ह्या निवडून आल्या. गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी […]