ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर करायला ५ डिसेंबर पर्यंत मुदत ; अन्यथा होणार कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाग घेतलेल्या सर्व उमेदवारांनी ५ डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. निकाल घोषित झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत हा खर्च दाखल करणे गरजेचे आहे. यासाठी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणूक खर्च दाखल करण्याचा ३० दिवसाचा कालावधी विचारात घेता ट्रू वोटर ॲप डाऊनलोड करुन निवडणूक खर्च दाखल करण्याबाबत सर्व संबंधित उमेदवारांना तात्काळ सूचित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ( बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसह ) निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मागील महिन्यात झालेल्या निवडणूकांसाठी ५ डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त / दुर्गम भागातील ज्या उमेदवारांना ट्रु वोटर ॲपद्वारे निवडणूक खर्च दाखल करणे शक्य नाही, त्यांना निवडणूक खर्चाचा हिशोब पारंपारिक पध्दतीने सादर करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. निवडणुकीचा खर्च सादर न केल्यास प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे इगतपुरी तहसीलदार कार्यालयाने कळवले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!