
इगतपुरीनामा न्यूज – गेल्या २५ वर्षांपासून सरपंच नसलेल्या नांदगाव सदो ह्या गावाला लोकनियुक्त सरपंच लाभले आहेत. संपूर्ण इगतपुरी तालुक्यात वेगळी ओळख असणाऱ्या ह्या गावाच्या निवडणुकीकडे संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. सौ. अनिता प्रभाकर राक्षे यांची गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या रूपाने नांदगाव सदो ह्या गावाला अखेर लोकप्रतिनिधी मिळाल्याने विकासाला गती येईल असा विश्वास व्यक्त होत आहे. संपूर्ण गाव आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे असा विश्वास नव्या सरपंच सौ. अनिता प्रभाकर राक्षे यांनी दिला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून सोनाली ललित राक्षे, अश्विनी नितीन भागडे ह्या निवडून आलेल्या आहेत. ह्या सर्वांच्या विजयासाठी गंगा भाऊ भागडे, नारायण वळकंदे, अरुण भागडे यांनी प्रभावी नेतृत्व आणि नियोजन केले. भालचंद्र भागडे, मनीष भागडे, संतोष भागडे, गणेश भागडे, ललित राक्षे, गुरुनाथ राक्षे, रवींद्र भागडे, शत्रुघ्न भागडे, रामदास आडोळे, श्रीकांत चव्हाण, करण भागडे, काळू भोईर, संजय भागडे, नितीन भागडे, रोशन भागडे, शिवशक्ती युवक मित्रमंडळ, जाणता राजा ग्रुप, शिव आर्यन मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी ह्या सर्व कामासाठी विशेष परिश्रम घेतले.