घोटी खुर्दच्या सरपंचपदी माणिक निवृत्ती बिन्नर विजयी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील पोटनिवडणूकीत सरपंचपदी माणिक निवृत्ती बिन्नर यांचा भरघोस मतांनी विजय झाला. विजयी झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. वार्ड क्रमांक तीन सर्वसाधारण जागेवर सौ. लहानुबाई जगन लोहरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी रामचंद्र रोंगटे, गणेश रोंगटे, जनार्दन निसरड, उत्तम बिन्नोर, नारायण लोहरे, रमेश निसरड  बळीराम रोंगटे, जगन जाधव, हिरामण निसरड, कृष्णा निसरड, लक्ष्मण लोहरे, उमेश लोहरे, जगन आवारी. मंत्री निसरड, अनिल निसरड लालु बिन्नोर, भोराजी कोकणे, लक्ष्मण निसरड, त्र्यंबक बिन्नोर नामदेव बिन्नोर, सोमनाथ निसरड, नाना डमाले, गोरख निसरड, अक्षय रोंगटे, चंद्रभान जाधव, नितिन म्हसळे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना जाधववाडी, लोहरेवाडी, कोकणेवाडी, रोंगटेवाडी, निसरडवाडी येत तरुण वर्ग यांचे मोठे सहकार्य लाभले. हे एकजुटीचे बळ असून सर्वांचे यश आहे. हे सर्व मतदार बंधू भगिनींच्या व तरुण वर्गाच्या प्रयत्नामुळे यश मिळाले आहे सर्व मतदार बंधू भगिनींचे नवनिर्वाचित सरपंच माणिक बिन्नर यांनी आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!