१६ ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद : उद्या होणाऱ्या मतमोजणीचे “असे” असेल नियोजन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरवात होणार आहे. त्यानंतर पहिला निकाल सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अपेक्षित असून साधारणपणे दुपारी १२ च्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन तहसीलदार प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशी माहिती इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी दिली आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त आणि सूक्ष्म नियोजन केले आहे. मतमोजणी प्रसंगी ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवार आणि समर्थकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे अशी माहिती इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी दिली. 

मतमोजणीच्या एकूण ६ फेऱ्या होणार असून एका फेरीत ३ ग्रामपंचायतीच्या ३ वार्डातील मतदान यत्रांच्या मतांची मोजणी होईल. यासाठी ९ टेबल असणार आहेत. या टेबलावर एकावेळी एक ईव्हीएमची मोजणी केली जाणार आहे. सहाव्या फेरीत एकच ग्रामपंचायत मोजली जाईल. पहिल्या फेरीत ओंडली, सोमज, मोगरे, दुसऱ्या फेरीत टाके घोटी, दौंडत, कृष्णनगर, तिसऱ्या फेरीत लक्ष्मीनगर, नांदगाव सदो, कुशेगाव, चौथ्या फेरीत शिरसाठे, धारगाव, घोटी खुर्द, पाचव्या फेरीत आडवण, मोडाळे, नागोसली आणि शेवटच्या सहाव्या फेरीत उंबरकोन ग्रामपंचायत मोजली जाईल. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मतमोजणीसाठी यापूर्वी प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

Similar Posts

error: Content is protected !!