भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या एका २२ वर्षीय आदिवासी युवतीला मृत्यूच्या जबड्यातून घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलने परत आणले आहे. मुंबई, नाशिकच्या नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या प्रकरणात हतबलता व्यक्त करून मोठ्या धोक्याची सूचना दिली होती. मात्र युवतीच्या नातेवाईकांचा मातोश्री हॉस्पिटलवरील पक्का विश्वास आणि […]
इगतपुरीनामा न्यूज – गोरगरिबांच्या घरात आपल्या दैदीप्यमान सामाजिक कार्यामुळे आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे देवदूत म्हणून गोरख बोडके सर्वत्र ओळखले जातात. दिवाळी काळातील आपल्या अभिनव कार्याचा वारसा त्यांनी ह्या वर्षीही जपला आहे. अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे वीज मंडळाचे तत्कालीन जागरूक कर्मचारी अमोल जागले सध्याच्या स्थितीत पाय एक नसल्यामुळे संकटग्रस्त अवस्थेत आहेत. त्यांना एका महिन्यात […]
इगतपुरीनामा न्यूज : श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामग्री १ ऑक्टोंबरपासून येण्यास सुरवात होणार आहे. उर्वरित लागणाऱ्या लिंक कोनर मशीन वस्त्रोद्योग विभागाच्या उर्वरित भागभांडवलामधून व सामाजिक न्याय विभागाच्या उर्वरित कर्जामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली […]
इगतपुरीनामा न्यूज : आधार कार्ड धोरणांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांमुळे आता नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला पुरावा जोडणे बंधनकारक आहे. जन्म दाखल्याशिवाय अन्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य मानला जात नाही. यापूर्वी जन्म दाखला नसला तरी केवळ रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सुध्दा नवीन आधार कार्ड नोंदणी करणे शक्य होते, मात्र या वर्षी […]
इगतपुरीनामा न्यूज : राज्यात दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात जवळपास तीस हजार जागा भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्पष्ट केले होते. त्यासाठीचे वेळापत्रकही त्यांनी जाहीर करून 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट नंतर आज सहा […]
लेखक – सीएमए अमित जाधवउपाध्यक्ष, नाशिक चॅप्टरदि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया नाशिक चॅप्टरचे मावळते अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करायचं ठरलं तर हा प्रवास त्यांना बऱ्याच गोष्टींचा अनुभव देऊन जाणारा ठरला. जेव्हा एखादा विद्यार्थी सीएमए ह्या प्रोफेशनल डिग्रीला एडमिशन घेतो तेव्हा तर त्याला नक्कीच इन्स्टिट्यूटमध्ये चॅप्टर लेव्हलला लीड करण्याची संधी […]
इगतपुरीनामा न्यूज : परीक्षेतील गुण हा आकड्यांचा खेळ असला तरी यातही काही गमतीदार उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. असेच एक गमतीदार आकड्यांचे उदाहरण आम्ही आज दाखवणार आहोत. आजच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल म्हटलं की कुणाला किती गुण मिळाले असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. घसघशीत गुण मिळवून पास होणाऱ्यांचं कमी गुण मिळवून पास होणाऱ्यांचं होत […]
इगतपुरीनामा न्यूज – कोरोनामुळे रोजगार ठप्प, खाण्यापिण्यांची भ्रांत, संचारबंदी, आजारपण आणि कोरोनाची संभाव्य लागण, औषधे, लसीचा तुटवडा, बेडच्या समस्या, ऑक्सिजन मिळेना आणि कोणी जवळचेही कोणी उभे करीना अशा अत्यंत भयानक अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील सामान्यातला सामान्य माणूस कोरोनाचा काळ सोसत होता. इगतपुरी तालुक्यातील एकच अवलिया व्यक्ती देवदूत बनून जातीधर्माच्या पलीकडे जाऊन फक्त माणसाच्या हृदयातला परमेश्वर प्रसन्न […]
इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रबळ असेल तर हिमालयाएवढे संकट सुद्धा साध्या वावटळीसारखे होऊन जाते. ह्यापुढे कितीही लोकांनी आणि विरोधकांनी खोडा घातला तरी सत्तेची माळ मात्र गळ्यात पडल्याशिवाय रहात नाही. असा बलवान राजयोग इगतपुरी तालुक्यातील एकाच कुटुंबासाठी वरदान ठरला आहे. मागील एकाच महिन्यात ह्याच कुटुंबातील पिता आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र यांना वेगवेगळ्या संस्थांच्या चेअरमनपदावर विराजमान झाले. […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज “ओलें मूळ भेदी खडकाचें अंग | अभ्यासासी संग कार्यसिध्दी” ह्या अभंगाद्वारे असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात. त्या अभंगाचा सारांश असा आहे की, दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते पण हेच विष सातत्याने थोडे थोडे […]