
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गावागावात पावसाने कहर केला आहे. बरेच रस्ते पाणीमय झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी भीषण अवस्था आहे. अशा खडतर परिस्थितीत इगतपुरी येथील साई आनंद भारत गॅस एजन्सीचे कर्मचारी पावसाची पर्वा न करता लाभार्थ्यांना सिलेंडर पोहोचवत आहेत. भर पावसात गुडघाभर पाण्यातून गॅस सिलेंडर वाहून नेत गरिबांच्या स्वयंपाकाची काळजी तत्परतेने घेतली जातेय. सिलेंडर वेळेत आणि घरापर्यंत पोहोच करणारी समाजसेवा व्हिडिओद्वारे प्रचंड व्हायरल झाली आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या भागात गॅस एजन्सीचे कर्मचारी तुंबलेले पाणी व पावसाची पर्वा न करता नागरिकांना घरपोच सेवा देत असल्याने लोकांनी या सेवेचे कौतुक केले आहे. थंडी, ऊन, पाऊस किंवा कोरोना असो पण यंदा मे महिन्यापासून पाऊस चालू आहे. तरीही माझे कर्मचारी हातापायात चिखल्या झाल्या, खांदे सोलले तरीही नियमित गॅस सिलेंडर पोचवत आहेत. कोणत्याही ग्राहकाची गैरसोय होऊ द्यायची नाही हे एकच ध्येय ठेवून ते काम करतात. अतिवृष्टी, हवामान खात्याचे रेड अलर्ट असूनही ड्युटी करतात. मला याचा अभिमान आणि गर्व आहे. माझ्या सर्व शिलेदारांना मी सॅल्यूट करतो अशी प्रतिक्रिया साई आनंद भारत गॅसचे संचालक ॲड. आनंद विजय चांडक यांनी दिली.
साई आनंद भारत गॅसचे संचालक ॲड. आनंद विजय चांडक हे कायमच लोकांच्या विविध सेवाकार्यात अग्रेसर असतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी सर्वोत्तम सेवा आणि लोकोपयोगी कार्यात आघाडी घेतली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी भरत हाडप, वृषाली गवळी, आशा शिद, प्रकाश शिंदे, सुशील कानडे, अशोक झडे, प्रदिप निसरड, कृष्णा देबनाथ, शैलेश शेलार, सुनिल लोहरे, स्वप्नील गाडे, एकनाथ भगत, विठ्ठल चौधरी, अजय वाघ, तानाजी झडे, पांडुरंग कामडी, नामदेव कामडी, बाळू जाधव, अरुण भागडे, दशरथ पाटेकर हे सर्वजण गावोगावी सिलेंडरची घरपोच सेवा देत आहेत. कथ्रूवंगणवाडी, चिंचलेखैरे, फणसवाडी, जामवाडी, आवळखेड, लंगडेवाडी, पिंपळगाव भटाटा, धार्णोली, बोर्ली, भावली, वाघ्याची वाडी, जामुंडे, बिटूर्ली, तारांगणपाडा, फांगुळगाव, वाकी, आडवण, कावनई, मानवेढे, तळोशी, उभाडे, टाके घोटी, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी, खंबाळे, देवळे, नांदगाव सदो, टिटोली, बोरटेंभे, संपूर्ण इगतपुरी शहर, घोटी आदी ठिकाणी जलद आणि तत्पर सिलेंडर सेवा मिळत असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.