“लक्ष्मी”च्या स्वागतासाठी धोंगडे परिवारात फुलले “गोकुळ” : लक्ष्मीस्वरूप मुलीच्या जन्माचे झाले वाजत गाजत स्वागत

Advt

इगतपुरीनामा न्यूज – खेडोपाडी सुध्दा आज मुलगा मुलगी एकसमान भावना मनामनात रुजत चालली आहे. तरीही मुलींचा जन्मदर गंभीरतेने कमी होतांना दिसतो. मुलीला लक्ष्मीचे प्रतीक मानून आनंद व्यक्त करणारा कुऱ्हेगाव येथील धोंगडे परिवार आहे. अश्विनी आणि गोकुळ धोंगडे हे दोघेही सुधारक आणि आध्यात्मिक विचारांचे आहेत. त्यामुळेच त्यांनी इगतपुरी सारख्या आदिवासी भागात लक्ष्मीस्वरूप मुलीच्या जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून गोकुळ धोंगडे काम पाहतात. पत्नी अश्विनी हिच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण परिवाराने मुलीच्या जन्माचे वाजत गाजत अनोखे स्वागत केले. यावेळी रुग्णालयात पेढे वाटून, शाल, श्रीफळ देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. लक्ष्मी घरात आली असे समजून गोकुळ धोंगडे यांनी मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी आपले भव्य पद्धतीने वाहन सजविले होते. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, सकल मराठा समाजाचे नेते करण गायकर, नारायण राजे भोसले, माजी सैनिक विजय कातोरे, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण जाधव, डॉ महेंद्र शिरसाठ, गौतम भोसले, बाळासाहेब सुरुडे, गोकुळ राव, तुकाराम वारघडे, सखाराम गव्हाणे, शिवाजी काजळे, विक्रम डावरे, संदीप उगले, विक्रम पुंडे, योगेश शिंगोटे आदींनी त्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. ‘पहिली बेटी-धनाची पेटी’ हे ब्रीदवाक्य घरोघरी ऐकायला मिळत आहे. वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच ही बुरसटलेली मानसिकता मागे टाकत लक्ष्मीस्वरूप असणाऱ्या मुलीच्या जन्माचे स्वागत केले असल्याचे गोकुळ धोंगडे यांनी सांगितले. मुलीच्या स्वागतासाठी धोंगडे परिवारात जणू “गोकुळ” फुलले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!